आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Union Minister Nitin Gadkari Infects Corona Virus, Tirupati MP Bali Durga Prasad Dies Due To Corona

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा विळखा:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोनाची लागण, तिरुपतीचे खासदार बाली दुर्गाप्रसाद यांचे कोरोनाने निधन

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुधवारी देशातील रुग्णसंख्या 51लाखांवर गेली, अॅक्टिव्ह रुग्णसंख्याही 10 लाखांवर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी याबाबत बुधवारी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना प्रोटोकॉल लक्षात ठेवून स्वतःची काळजी घ्यावी अशी विनंती देखील त्यांनी केली''.

दुसरीकडे, आंध्र प्रदेशातील तिरुपतीचे खासदार बाली दुर्गाप्रसाद (६५) यांचे कोरोनाने निधन झाले.

देशात ५१ लाख रुग्ण

दरम्यान, बुधवारी देशातील रुग्णसंख्या ५१ लाखांवर गेली. ९८,०७० नवे रुग्ण आढळले. हा एका एकाच दिवसातील रुग्णसंख्येचा दुसरा उच्चांक आहे. यापूर्वी ८ सप्टेंबरला १ लाख ४,७८९ रुग्ण आढळले होते. अॅक्टिव्ह रुग्णसंख्याही १० लाखांवर गेली आहे.