आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Union Minister Nitin Gadkari's Attendance At Sharad Pawar's Banquet, Maharashtra Ministers, MPs, MLAs From All Parties|Marathi News

गल्लीत गोंधळ, दिल्लीत प्रीतिभोज:शरद पवारांच्या मेजवानीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची हजेरी, महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, सर्वपक्षीय आमदारांची उपस्थिती

दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत ठाकरे सरकारने एसआयटी नेमून केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात आघाडी उघडताच मंगळवारी संजय राऊतां विरोधात ईडीने कारवाई केली. गल्लीत हा राजकीय गोंधळ सुरू असताना नवी दिल्लीत रात्री आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आयोजित केलेल्या प्रीतिभोजनास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खास हजेरी लावली.

६ जनपथ निवासस्थानी मेळा : पवार यांच्या ६ जनपथ निवासस्थानी झालेल्या मेजवानीप्रसंगी संजय राऊत तसेच महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, सर्वपक्षीय आमदारांची उपस्थिती होती. विधिमंडळ नवनिर्वाचित सदस्यांसाठी संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त पवारांनी ही मेजवानी दिली.

बातम्या आणखी आहेत...