आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Union Minister Prahlad Patel Write To Arvind Kejriwal Object To National Flag Colour Behind CM Chair

केजरीवाल यांच्यावर तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप:केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल म्हणाले - CM च्या खुर्चीमागे लावलेल्या ध्वजामध्ये पांढरा भाग कमी करुन हिरवा भाग जोडलेला वाटतो

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्रीय संस्कृती राज्य मंत्री प्रल्हाद पटेल यांनी केजरीवाल यांना पत्र लिहून आक्षेप नोंदवला आहे
  • पटेल यांनी उपराज्यपाल अनिल बैजल यांनाही पत्राची प्रत पाठवून केजरीवाल यांची तक्रार केली आहे

दिल्ली आणि केंद्र सरकारच्या कोरोना व्यवस्थापनावरून झालेल्या वादानंतर तिरंगा विवाद सुरू झाला आहे. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. गुरुवारी केजरीवाल यांना पत्र लिहून पटेल यांनी आक्षेप घेतला आहे. यासोबतच उपराज्यपाल अनिल बैजल यांनाही पत्राची प्रत पाठवून केजरीवाल यांची तक्रार केली आहे.

पटेल यांच्याकडून केजरीवाल यांना पाठवण्यात आलेले पत्र जसेच्या तसे...
'हे पत्र आपल्या सर्वांसाठी राष्ट्रध्वजाचा आदर करण्याची जबाबदारी लक्षात घेऊन मी लिहित आहे. बर्‍याच दिवसांपासून, जेव्हा मी तुम्हाला टीव्ही चॅनेलवर भाषण करताना पाहतो तेव्हा आपल्या खुर्चीच्या मागे असलेल्या राष्ट्रध्वजाच्या स्वरूपाकडे लक्ष जाते. कारण तो ध्वज मला त्याच्या सन्मान आणि घटनात्मक स्वरूपापेक्षा वेगळा वाटतो. मधला पांढरा भाग कमी करुन हिरवा भाग जोडलेला वाटतो, जो भारत सरकार गृह मंत्रालयाद्वारे निर्दिष्ट भारतीय ध्वज संहितेमध्ये नमूदकेलेल्या भाग 1 च्या 1.3 मध्ये दिलेल्या मानकांचा प्रयोग दिसत नाही.'

'ज्या पद्धतीने ध्वज स्थापित केला गेला आहे, त्यावरून असे दिसते आहे की राष्ट्रीय ध्वजाला आदर देण्याऐवजी तो सजावटीसाठी वापरला जात आहे. राष्ट्रीय गौरव अपमान प्रतिबंध अधिनियम 1971 च्या कलम 2 (ix) ज्यानुसार ध्वजाचा वापर वक्त्याच्या मंचाला सजवण्यासाठी केला जाणार नाही. कलम 2.2 (i) झेंड्याची स्थिती सन्मानपूर्वक आणि विशिष्ट असायला हवी. (ix) अनुसार कोणत्याही इतर प्रकारज्या सजावटीसाठी झेंडाचा वापर केला जाऊ नये.

'भारताचे रहिवासी असल्याने राज्याचे गौरवपूर्ण मुख्यमंत्रिपद असताना आपण प्रत्येकाची अपेक्षा आहे की आपण राष्ट्रीय गौरवाचे प्रतीक असलेल्या तिरंग्याचा सन्मान आणि मर्यादा राखल्या पाहिजे.'

बातम्या आणखी आहेत...