आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Union Minister Resign On The Basis Of A Rumour? : Shiv Sena MP Sanjay Raut In Rajya Sabha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राऊतांचा मोदी सरकारला सवाल:एका अफवेमुळे केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला का? खासदार संजय राऊतांचा राज्यसभेत पंतप्रधानांना सवाल

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या राजीनाम्यावरूनही राऊत यांनी मोदींना टोला लगावला.

राज्यसभेत आज शेतकरी उत्पादन व वाणिज्य विधेयक, 2020, शेती माल किंमत आणि कृषी सेवा विधेयक 2020 या संदर्भातील शेतकरी विधेयक सादर करण्यात आली. ही विधियके राज्यसभेत पासही झाली आहेत. तत्पूर्वी राज्यसभेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षांनी या कृषी विधेयकांचा कडाडून विरोध केला.

यापूर्वी ही विधेयके शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणणारी आहेत. तसेच शेतकर्‍यांना आपले पीक कोणत्याही स्थळी विकता येऊ शकेल. हे विधेयक एमएसपीशी संबंधित नाही. एमएसपी सुरुच आहे आणि पुढेही राहील. या विधेयकामुळे शेतकर्‍यांचे जीवन बदलू शकेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. यावरुन आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी थेट मोदींना सवाल केला आहे. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी ही दोन विधेयक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी राज्यसभेत आज मांडली. या विधेयकांवर चर्चा करताना विरोधी पक्षांच्या खासदारांनी भूमिका मांडल्या. यावर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, 'या विधेयकांना शेतकऱ्यांचा विरोध आहे. तर पूर्ण देशात याला विरोध का होत नाहीये? जर देशभरात विरोध होत नाहीये म्हणजे याचा अर्थ असा होतो की, विधेयकासंदर्भात काही गैरसमजही आहेत. सरकारकडून ही गैरसमज दूर करण्यात आली पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, विधेयकाबाबत काही अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे मला विचारायचं की, अफवेमुळेच एका मंत्र्यानं राजीनामा दिला का? असा सवाल राऊतांनी विचारला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या राजीनाम्यावरूनही राऊत यांनी मोदींना टोला लगावला.

बातम्या आणखी आहेत...