आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीएससी-2020 चे गुण जाहीर:टॉपर शुभमला 52.04%, जागृतीला 51.95% गुण; प्रिलिम्सच्या कट ऑफमध्ये घट

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा-२०२० चे कट ऑफ मार्क्स आणि उमेदवारांचे वैयक्तिक गुण जाहीर केले आहेत. बुधवारी जारी माहितीनुसार, टॉपर शुभमकुमारला ५२.०४% आणि दुसऱ्या क्रमांकावरील जागृती अवस्थीला ५१.९५% गुण मिळाले आहेत. शुभमला १७५० गुणांच्या लेखी परीक्षेत ८७८ गुण आणि २७५ गुणांच्या व्यक्तिमत्त्व चाचणीत (मुलाखत) १७६ गुण मिळाले आहेत. शुभमने २०२५ पैकी १०५४ गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे.

एकूणच दुसऱ्या क्रमांकावरील आणि मुलींत पहिली ठरलेल्या जागृतीला १०५२ गुण मिळाले. लेखी परीक्षेत तिला ८५९ आणि मुलाखतीत १९३ गुण मिळाले. तिसऱ्या स्थानावरील अंकिता जैनला जागृतीपेक्षा फक्त एक गुण कमी आहे. तिला १०५१ गुण मिळाले. अंकिताने लेखी परीक्षेत ८३९, तर मुलाखतीत २१२ गुण मिळवले. यंदा मुलाखतीत सर्वाधिक २१५ गुण देण्यात आले, तर लेखी परीक्षेत सर्वाधिक ८७८ गुण मिळाले आहेत.

प्रिलिम्सच्या कट ऑफमध्ये घट
सामान्य वर्गासाठी सीएस प्रीलिम्स कट-ऑफ ९२.५१, मेनमध्ये ७३६ व अंतिममध्ये ९४४ राहिला. आेबीसीसाठी तो अनुक्रमे ८९.१२, ६९८ व ९०७ आहे, तर एससीसाठी ७४.८४, ६८२ आणि ८७६ आहे. एसटीत प्रिलिम्स कट-ऑफ ८६.७१, मेनमध्ये ६४८, अंतिममध्ये ८६७ गुण आहेत.

हे उमेदवार आहेत टॉप-१० मध्ये
नाव लेखी मुलाखत एकूण
शुभमकुमार 878 176 1054
जागृती अवस्थी 859 193 1052
अंकिता जैन 839 212 1051
यश जलुका 851 195 1046
ममता यादव 855 187 1042
मीरा के. 835 206 1041
प्रवीणकुमार 848 193 1041
जेके नागजी भाई 858 182 1040
अप्ला मिश्रा 816 215 1031
सत्यम गांधी 827 201 1028

बातम्या आणखी आहेत...