आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील बँकांतून हजारो कोटींची कर्जे घेऊन कोट्यधीश विदेशात पळाल्याच्या बातम्या तुम्ही वाचता. अशा काळात एक बँक अशी आहे, जेथे वर्षभरात एखाद्या कर्जदाराचा हप्ताही उशिरा पोहोचला नाही. कोणीही डिफॉॅल्टर नाही. अधिकारी-कर्मचारी आणि खातेधारकही महिलाच आहेत. राजस्थानच्या बडोदा क्षेत्रीय ग्रामीण बँकेने मागील वर्षी मार्चमध्ये ३ महिला शाखा उघडल्या. झुंझुनूच्या कारी, बख्तावरपुरा आणि पातुसरीतील या शाखांत ११ महिन्यांत १४८७६ महिलांनी खाते उघडले. ३३६६ महिलांना कर्ज दिले. या शाखांनी ११६ कोटींचे व्यवहार केले. प्रादेशिक व्यवस्थापक योगेश शर्मा म्हणाले की, या शाखांद्वारे महिलांना स्वयंरोजगाराशी जोडल्याने कर्ज घेणाऱ्या महिलांची संख्या वाढली.
महिला शाखा : बख्तावरपुरा
मॅनेजर पल्लवी असून सुनीता, अंकिता बुडानियां, देवाश्री व अंकिता कर्मचारी आहेत. व्यवहार ५६.७० कोटींचा आहे. ५९४९ खातेधारकांनी २८.१६ कोटी रु. जमा केले. शाखेने १७१० महिलांना कर्ज दिले. कोणाचाही हप्ता येणे नाही.
महिला शाखा : कारी
नीतू कुमारी मॅनेजर तर कर्मचाऱ्यांत प्रियंका व पारूल मीणा आहेत. शाखेने ४७१६ खातेधारकांकडून १२.६१ कोटी जमवले. ८१२ कर्ज खात्यांपैकी एकही एनपीए नाही.
महिला शाखा : पातुसरी
सुभिता मॅनेजर असलेल्या शाखेने ४२२० महिलांचे १६.१९ कोटी रु. जमा केले. ८४४ महिलांना कर्ज देण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.