आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीचे स्मार्ट पत्ते...:दिल्लीच्या लुटियन्स झोनमध्ये प्रत्येक घरावर युनिक क्यूआर कोड, कचरा गाडी न थांबता निघाली तर नियंत्रण कक्षाला त्वरित मिळेल माहिती

नवी दिल्ली / अनिरुद्ध शर्माएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात स्मार्ट सिटीसाठी निवडलेल्या १०० शहरांपैकी नवी दिल्ली महापालिका म्हणजे एनडीएमसीने प्रथमच स्मार्ट ॲड्रेसिंगचे काम पूर्ण केले आहे. राष्ट्रीय राजधानीत लुटियन्स झोन नावाने प्रख्यात एनडीएमसीच्या कक्षेत येणाऱ्या ५० हजारपेक्षा अधिक घरांना ९ डिजिटचा युनिक अल्फा-न्यूमेरिक कोड देण्यात आला आहे. या कोडला एनडीएमसी डिजिटल डोअर नंबर (एनडीडीएन) असे नाव देण्यात आले आहे. एका छोट्याशा स्टील प्लेटवर हा एनडीडीएन अंकित आहे, तो एनडीएमसीच्या कक्षेत येणाऱ्या प्रत्येक घराच्या दारावर लावण्यात आला आहे. या प्लेटवरील क्यूआर कोडवर घराचा पूर्ण तपशील डिजिटल फॉर्ममध्ये नोंदलेला आहे. हा कोड स्कॅन करून त्या घराचे पाणी, वीज किंवा गॅसचे थकित बिल आणि थकित मालमत्ता कराची माहिती मिळू शकते तसेच या सर्व पेमेंट्सचे जुने रेकॉर्डही पाहता येऊ शकते. वीज, पाणी, गॅस आणि इतर सुविधांशी संबंधित तक्रारीही याच यंत्रणेद्वारे केल्या जाऊ शकतात. घरोघरचा कचरा जमा करण्याच्या प्रक्रियेतही हा क्यूआर कोड क्रांतिकारी बदल आणेल. कचरा जमा करणारी गाडी दाराजवळून जाईल तेव्हा गाडीवर लावलेले स्कॅनर १५ मीटरच्या कक्षेतील एनडीडीएनला स्कॅन करेल. जर ही गाडी एखाद्या घराबाहेर न थांबता निघून गेली तर गाडीने त्या घराच्या दाराबाहेर थांबून कचरा गोळा केला नाही हे नियंत्रण कक्षाला कळेल.

२६७ प्रकारची माहिती असलेला डिजिटल नकाशा तयार, एका क्लिकवर समोर असेल या भागातील शौचालयांपासून रुग्णालयांपर्यंतची माहिती
यासोबतच एनडीएमसीने जिऑग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टिम (जीआयएस) तंत्राचा वापर करत २६७ प्रकारचे नकाशे तयार केले आहेत. एकाच डिजिटल नकाशावर सर्व सार्वजनिक शौचालये, शाळा, पार्किंग स्थळे, रुग्णालये, कार्यालयांपासून विजेचे सर्व खांब, सीसीटीव्हीपर्यंतची माहिती दिली आहे. त्यात खुले आणि भूमिगत नाले आणि भूमिगत इंटरनेट तसेच विजेच्या केबलव्यतिरिक्त सीवर आणि गॅस पाइपलाइनचीही माहिती उपलब्ध आहे. युजर आपल्या गरजेनुसार नकाशावर ही माहिती पाहू शकतो. लवकरच ही माहिती प्रत्येक नागरिकासाठी उपलब्ध होईल.

आम्ही देशभरात स्मार्ट ॲड्रेसिंगचे एक रोल मॉडल तयार केले आहे. इतर स्मार्ट सिटी व अन्य शहरेही स्मार्ट ॲड्रेसिंगसाठी या यंत्रणेचा अवलंब करू शकतात. - कुणालकुमार, मिशन संचालक, स्मार्ट सिटी मिशन

लवकरच गुगल मॅपवर याच डेटावरून मिळेल लोकेशन
लक्षात राहण्यासाठी डीडीएनचे ९ आकडे कमी करून फक्त ४ आकडे केले जात आहेत. लवकरच हा डेटा गुगलसोबत शेअर केला जाईल. आगामी काळात डीडीएनद्वारेच घर आणि रस्ता शोधणे सोपे होईल. ओळख पटवण्यात चूक होऊ नये यासाठी गुगलवर प्रत्येक पत्त्याच्या अक्षांश, रेखांशासह इमारतीचा फोटोही असेल.

प्रत्येक डीडीएन कोडची तीन भागांत विभागणी
डीडीएन एक लहान स्टील प्लेट आहे. ती प्रत्येक घराच्या दारावर लावली आहे. त्यातील पहिले तीन डिजिट इंग्रजीतील आद्याक्षरे आहेत, जे त्या भागाच्या नावाचा शॉर्टफॉर्म आहेत. त्यासाठी संपूर्ण नवी दिल्ली भागाला ४८ लहान प्रचलित व ऐतिहासिक भागांत विभाजित करून ४८ कोड तयार केले आहेत. पुढील तीन आकडे रस्ता क्रमांक असून शेवटचे तीन आकडे घराचा क्रमांक आहे.

बातम्या आणखी आहेत...