आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Unique Tradition; Marriage Of Minors Planted For Prosperity In Bansvada Rajastan; News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनोखी परंपरा:संपन्नतेसाठी लावले अल्पवयीन मुलांचे लग्न; अर्ध्या रात्री घरातून उचलून नेले दोन्ही मुलांना, आयोजनात कुटुंबाचा समावेश

बांसवाडा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मध्यरात्रीच्या शांत वातावरणात तरुणांच्या टाेळ्या अल्पवयीन मुलांच्या शाेधात बाहेर पडतात

हे अनोखे चित्र अाहे राजस्थानमधील आदिवासीबहुल बांसवाडा जिल्ह्यातील बडोदिया गावचे. होळीला येथे दोन अल्पवयीन मुलांचे लग्न लावून देण्यात अाले. मध्यरात्री दोघांनाही घराबाहेर नेण्यात आले. वधू बनलेल्या मुलाला साडी नेसवून त्याचा श्रृंगार करण्यात अाला. पंडितने विधीपूर्वक कार्य केले. मंडप सजवला. वराने वधूला मंगळसूत्र घातले. त्यानंतर सात फेरे झाले आणि शेवटी कन्यादान. संपूर्ण गाव या कार्यक्रमाचे साक्षीदार झाले. या अनोख्या परंपरेचे पालन करावे ही गावाचीच इच्छा. असे लग्न दरवर्षी हाेते.

मध्यरात्रीच्या शांत वातावरणात तरुणांच्या टाेळ्या अल्पवयीन मुलांच्या शाेधात बाहेर पडतात. मुलाला भेटल्यावर नाचतात आणि गाणी गातात. हे जोडपे सापडल्याचा ढाेल वाजवून संदेश देण्यात येताे की जाेडपे मिळाले. त्यानंतर गावकरी लग्नात हजेरी लावतात

बातम्या आणखी आहेत...