आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Unique Wedding Of Tamil Nadu In Pictures Mamta Banerjee Weds Socialism, Marxism And Communism Attend Function; News And Live Updates

तामिळनाडूत अनोखा विवाहसोहळा:ममता बॅनर्जी आणि सोशलिजमने बांधली लगीनगाठ, मार्क्सिजम आणि कम्युनिजम बनले वराती

चेन्नई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हजारो अज्ञात लोकांनी अभिनंदनाचे संदेश पाठवले

तामिळनाडूच्या सालेममध्ये रविवारी ममता बॅनर्जी आणि समाजवादाने सात जन्मांच्या बंधनात अडकले. तर लग्नात कम्युनिझम, लेनिनवाद आणि मार्क्सवाद यांनी वरातीची भूमिका साकारली. आश्चर्यचकित होऊ नका... ही काही राजकीय स्टंट नाहीयेत. तर एका वधू वराचे खरे नावे आहेत. जे त्यांच्या लग्नाच्या प्रत्रिकेत छापले गेलेले आहे. या अनोख्या नावाचे अनोखे लग्न तामिळनाडूतील सालेमधील कोंडलीपट्टी भागात झाले आहे. या लग्नाचे काही व्हिडियो आणि फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून संपूर्ण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

तमिळनाडू सीपीआयचे सचिव आर मुथ्रसानी यांनीही या लग्नाला हजेरी लावली.
तमिळनाडू सीपीआयचे सचिव आर मुथ्रसानी यांनीही या लग्नाला हजेरी लावली.

वर आणि त्यांच्या भावांच्या विशेष नावांचे कारण
समाजवादाचे कुटुंब अनेक वर्षांपासून भारतीय कम्युनिस्ट पार्टीशी (CPI) संबंधित आहे. त्याचे वडील ए मोहन हे भाकपचे जिल्हा सचिव आहेत. ते म्हणाले की, सोव्हिएत संघ विघटनानंतर अनेकांना कम्युनिझम संपल्याचे वाटत होते. त्यामुळे त्या वेळी मी माझ्या मुलांचे नाव कम्युनिझम, लेनिनवाद आणि समाजवाद ठेवले. तर दुसरीकडे मुलीचे नाव ममता बॅनर्जी असणे हा योगायोग आहे.

वधू आणि वर आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत.
वधू आणि वर आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत.

हजारो अज्ञात लोकांनी अभिनंदनाचे संदेश पाठवले
वधू-वरांनी सांगितले की, त्यांना हजारो लोकांकडून अभिनंदनाचे संदेश आले असून ते त्यांना ओळखतदेखील नव्हते. वधू म्हणाली की, दीदी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या तेव्हाच मला माझ्या नावाची खरी शक्ती कळाली.

वधू ममता बॅनर्जी आणि वर समाजवाद. समाजवाद म्हणतो की, शाळेत अशा नावांसाठी त्याची आणि त्याच्या भावांची थट्टा केली गेली.
वधू ममता बॅनर्जी आणि वर समाजवाद. समाजवाद म्हणतो की, शाळेत अशा नावांसाठी त्याची आणि त्याच्या भावांची थट्टा केली गेली.
बातम्या आणखी आहेत...