आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Unity Of Opposition In The Country Is Not The Purpose Of Padayatra: Congress, 100 Km Journey Complete

भारत जोडो यात्रा:देशात विरोधकांची एकजूट हा पदयात्रेचा उद्देश नाही : काँग्रेस, १०० किमीचा प्रवास पूर्ण

तिरुवनंतपुरम13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा सोमवारी सहावा दिवस होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली यात्रेने आतापर्यंत १०० किलो मीटरचे अंतर पूर्ण केले आहे. राहुल गांधी यांनी सोमवारी सकाळी वेल्लायानी जंक्शन येथून पदयात्रेला सुरूवात केली. तत्पूर्वी राहुल म्हणाले, केरळ राज्य सर्वांचा आदर करणारे आहे. हे राज्य स्वत: चे विभाजन किंवा द्वेष पसरवण्याची परवानगी देत नाही. त्यामुळेच भारत जोडो यात्रा या विचारांचा विस्तार करण्याचा प्रयत्न आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, यात्रा नियोजित वेळापत्रकानुसार मागे आहे. दररोज २५ किमीचा प्रवास व्हावा, असे राहुल यांना वाटते. परंतु बाकी सहभागींना दररोज २० ते २१ किमी चालावे असे वाटते.

रमेश यांनी राहुल यांच्या टी-शर्ट प्रकरणावरून भाजपवर टीका केली. रमेश म्हणाले, त्यांना हा मुद्दा बनवायची इच्छा आहे. याचा अर्थ ते घाबरलेले आहेत. घटक पक्षांनी ही बाब समजून घेतली पाहिजे. ही यात्रा विरोधकांना जोडण्यासाठी नव्हे तर काँग्रेसला बळकट करण्यासाठी आहे. क्रांतिकारकांच्या सन्मानार्थ कार्यक्रमात राहुल सहभागी झाले नसल्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुधाकरण यांना माफी मागावी लागली. काँग्रेसने खाकी चड्डीला आगीचे छायाचित्र शेयर केले. त्यावरून भाजपने आरोप केला. प्रमुख विरोधी पक्ष हिंसाचारावर उतरला आहे. खाकी चड्डी आधी संघाचा पोषाख होता. आता स्वयंसेवक फुलपँट परिधान करतात.

बातम्या आणखी आहेत...