आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामिशन २०२४ पूर्वी विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न पुढे नेत तामिळनाडूचे सीएम एम.के. स्टॅलिन यांनी सामाजिक न्यायाचा मंच साकारला आहे. यावर ३७ पक्ष आणि संघटनांना निमंत्रण दिले आहे. या वेळी ओडिशाचे सीएम नवीन पटनायक यांचा बिजद आणि आंध्र प्रदेशचे सीएम जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर-सीपी सहभागी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ते आले नाहीत.
बिजद खासदाराने भास्करला सांगितले की, आमच्या पक्षाला बोलावले होते, मात्र पक्षाने प्रतिनिधी न पाठवण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधी यांची खासदारकी हिरावल्यानंतर काँग्रेससोबत १८ अन्य विरोधी पक्ष एकजूट दिसत होते. स्टॅलिन यांची ही बैठक या विक्रमापासून मागे राहिली. आभासी व प्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतींच्या बैठकीत राजदकडून तेजस्वी यादव सहभागी झाले. मात्र, नितीशकुमार यांच्या पक्षाची गैरहजेरी हैराण करणारी आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.