आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनलॉक- 1:17 राज्यांत मॉल-रेस्तराँ उघडले, काही राज्यांत अद्याप निर्णय नाही, महाराष्ट्राचा 65 स्मारके बंद ठेवण्याचा निर्णय

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूजा-उपासनेच्या 820 स्मारके सुरू करण्याच्या मंजुरीनंतरही महाराष्ट्राचा 65 स्मारके बंद ठेवण्याचा निर्णय

देशात अनलॉक-१ चा दुसरा आठवडा सुरू होताच सोमवारी ७५ दिवसांनंतर हॉटेल, रेस्तराँ सुरू झाले. यामुळे आर्थिक कारभाराच्या कक्षा रुंदावल्या आहेत. मात्र, ज्या राज्यांत रेस्तराँ सुरू झाले तेथे फिजिकल डिस्टन्सिंग पाळत खूप कमी लोकांची वर्दळ दिसली. मंदिर, मशीद, गुरुद्वारासह इतर धार्मिक स्थळे सुरू होण्याबरोबरच २५ राज्यांत धार्मिक विधीही सुरू झाले आहेत. उत्तर प्रदेशात अयोध्या सुरू झाली, मात्र वृंदावनात कोरोना संसर्गाच्या शक्यतेने बांके बिहारीसह इतर मंदिरे या महिन्यात बंद राहतील. आंध्र प्रदेशात तिरुपती मंदिर सुरू झाले, मात्र तेथे ११ जूनपासून दर्शन सुरू होईल. काशी विश्वनाथ आणि वैष्णोदेवी मंदिर मंगळवारी सुरू होईल. दरम्यान, गुजरातसह १७ राज्ये-केंद्रशासित प्रदेशांत सोमवारपासून कंटेनमेंट झोनबाहेर मॉल सुरू होतील. केरळात मंगळवारपासून मॉल-धर्मस्थळे सुरू होतील.

या राज्यांत मॉल सुरू

शॉपिंग सेंटर्स असोसिएशनच्या (एससीएआय) मते, सोमवारपासून आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, चंदिगड, दिल्ली, गोवा, गुजरात, प. बंगाल, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, तेलंगण, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, पुद्दुचेरी, कर्नाटक आणि हरियाणातील मॉल सुरू झाले. हरियाणात गुडगाव व फरिदाबाद येथील मॉल जूनमध्ये बंद राहतील.

या राज्यांत निर्णय नाही : हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, नागालँड, मिझोराम, सिक्कीम आणि त्रिपुरा

या राज्यांत ३० जूनपर्यंत मॉल बंद : महाराष्ट्र, झारखंड, मणिपूर, मेघालय, ओडिशा, तामिळनाडू, दमण-दीव.

> सांस्कृतिक मंत्रालयाच्या पूजा-उपासनेच्या ८२० स्मारके सुरू करण्याच्या मंजुरीनंतरही महाराष्ट्राने ६५ स्मारके बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...