आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Unlock 3 Guidelines Gym Requires 6 Feet Distance Between Two Persons, Face Shield Is Useful Instead Of Mask

अनलॉक 3:जिममध्ये दोन व्यक्तीत 6 फुटांचे अंतर आवश्यक, मास्कऐवजी फेस शील्ड उपयोगी, याही मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशभरात 5 ऑगस्टपासून अनलॉक-३ लागू होत आहे

देशभरात ५ ऑगस्टपासून अनलॉक-३ लागू होत आहे. यात जिम, व्यायामशाळा व योग संस्था उघडण्याची परवानगी आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ६५ वर्षांपेक्षा जास्त वृद्ध व १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना बंदिस्त जागेतील जिम वा याेग प्रशिक्षण संस्थांत न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जिम व योग संस्थांत प्रत्येकाला किमान ६ फुटांचे अंतर ठेवावे लागेल. परिसरात फेस मास्कऐवजी फेस शील्ड वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मास्क लावून व्यायाम करताना श्वासोच्छ्वासास त्रास होऊ शकतो.

याही मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश
- हात साबणाने किमान ४० ते ६० सेकंद धुण्याचा सराव करावा. अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर वापरावे.
- संस्थेचा परिसर, परिसरातील इमारती, रूमसह स्टाफ व व्हिजिटर्सच्या उपस्थितीच्याही जागा सॅनिटाइझ कराव्यात.
- लोकांना वेगळे वर्कआऊट शूज आणायला सांगावेत. जिममधील उपकरणेही सॅनिटाइझ करण्यात यावीत.
- याेग केंद्र व जिमचा फ्लाेअर एरिया प्रतिमाणसी चार चौरस मीटरच्या हिशेबाने वितरित करावा. सर्व उपकरणे ६ फुटांच्या अंतरावर ठेवावीत.
- योगिक क्रिया सध्या बंदच ठेवण्याचा सल्ला. त्या गरजेच्या असतील तर खुल्या जागेतच कराव्यात.

बातम्या आणखी आहेत...