आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Unlock 4 : Metras Are Likely To Run In NCR From September 1, Schools And Colleges Will Remain Closed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनलॉक 4.0:एनसीआरमध्ये 1 सप्टेंबरपासून मेट्राे धावण्याची शक्यता, शाळा- कॉलेज बंदच राहतील

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकार आयआयटी-आयआयएम सुरू करण्याच्या विचारात

अनलॉक-३ चे २५ दिवस पूर्ण झाले आहेत. यासोबतच केंद्र सरकारने अनलॉक-४ ची तयारी सुरू केली आहे. गृह मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले, अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात १ सप्टेंबरपासून दिल्ली-एनसीआरमध्ये मेट्रो रेल्वे सेवा अर्ध्या क्षमतेनुसार सुरू करण्यास परवानगी मिळू शकते. मात्र, शाळा-महाविद्यालये सध्या सुरू होण्याची आशा नाही. सरकार आयआयटी आणि आयआयएमसारख्या संस्था पुन्हा सुरू करण्याबाबत विचार करत आहे. बारदेखील सुरू करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. मात्र, काउंटरवरून घरी घेऊन जाण्याची मद्यविक्रीची अट असू शकते. दरम्यान, सरकारच्या वतीने सोमवारी स्पष्ट करण्यात आले की, टीव्ही कार्यक्रम आणि चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी एक दिवसापूर्वी जाहीर दिशानिर्देशच वेब सिरीज आणि मीडिया प्रॉडक्शनसाठी लागू असतील. माहिती व प्रसारण मंत्रालयाने सांगितले की, सर्वांना मास्क आणि शारीरिक अंतर पाळावे लागेल.

कर्नाटक: प्रवाशांना संस्थात्मक क्वॉरंटाइन गरजेचे नाही

कर्नाटक सरकारने आंतरराज्य प्रवास करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, प्रवाशांना आता संस्थात्मक क्वॉरंटाइन गरजेचे नसेल. याशिवाय सेवा सिंधू पोर्टलवर नोंदणी, राज्यांच्या सीमा, बस व रेल्वे स्टेशन, विमानतळांवर वैद्यकीय तपासणीही होणार नाही. तसेच प्र‌वाशांच्या हातावर शिक्काही मारला जाणार नाही.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser