आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Unlock 4 : Metro Back On Track After 169 Days, Delhi Had 7500 Passengers In 4 Hours; The Railway Station In The Containment Zone Will Remain Closed

अनलॉक - 4:तब्बल 169 दिवसांनंतर मेट्रो पुन्हा रूळावर, दिल्लीत 4 तासांत 7500 होते प्रवासी; कंटेनमेंट झोनमधील रेल्वे स्टेशन राहणार बंद

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीबरोबरच चेन्नई, बंगळुरू, कोची, हैदराबाद, लखनऊ, अहमदाबादेत मेट्रो सुरू
  • तापमान आणि हात सॅनिटाइझ केल्यानंतरच प्रवाशांचा होणार स्थानकात प्रवेश

देशात सुमारे ५ महिन्याच्या खंडानंतर सोमवारपासून मेट्रो सेवा सुरू झाली. दिल्लीत मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सांगितले, यलो व रॅपिड लाइनवर सकाळी ७ ते ११ दरम्यान ७५०० लोकांनी प्रवास केला.

१६९ दिवसानंतर दिल्लीसह नोएडा, चेन्नई, बंगळुरू, कोची, हैदराबाद लखनऊ व अहमदाबादेतही मेट्रो सुरू झाली आहे. प्रवाशांनी मास्क वापरण्याबरोबरच अनेक अटी यात घालण्यात आल्या आहेत. पहिल्याच दिवशी बहुतांश शहरात खूपच कमी लाेक प्रवासास आले. कोलकात्यात ८ सप्टेंबरपासून सेवा सुरू झाली आहे. काेरोनामुळे संपूर्णण देशभरात मेट्रो सेवा बंद करण्यात आली होती. दिल्लीत पहिली मेट्रो सकाळी ७ वाजता येलो मार्गावर हुडा सिटी सेंटरपासून (गुरूग्राम) समयपूर बादलीसाठी (दिल्ली) सुरु झाली. लखनऊमध्ये पहिली मेट्रो मुन्शी पुलियाहून विमानतळापर्यंत सुरु झाली. जयपूरमध्ये मेट्रो सेवा साेमवारपासून सुरू होऊ शकली नाही. ती केव्हा सुरू होईल याबाबत निश्चित काही ठरले नाही. दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनच्या (डीएमआरसी) अधिकाऱ्यांनी सांगितले, मेट्रो सेवा सकाळी ७ ते ११ दरम्यान व सायंकाळी ४ ते ८ दरम्यान उपलब्ध राहिल. अॅक्वा लाइनवर नोएडा-ग्रेटर नोएडा मेट्रोच्या १५ स्थानकावर फक्त एकाच दरवाजाने प्रवेश आणि बाहेर जायचे आहे. या लाइनशी संबंधित कंटेनमेंट झोनमधील स्थानके बंद राहतील. प्रवाशांनी आवश्यक असेल तेव्हा प्रवास करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सुरक्षा : तापमान आणि हात सॅनिटाइझ केल्यानंतरच प्रवाशांचा होणार स्थानकात प्रवेश

प्रवाशांनी तापमान तपासून घेतल्यानंतर आणि हात सॅनिटाइझ केल्यानंतरच स्थानकात प्रवेश मिळणार आहे. दिल्ली मेट्रोचे कर्मचारी व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान फेसशील्ड, मास्क व हातमोजे घातलेले दिसून आले. दिल्लीचे मुख्यमं़ी अरविंद केजरीवाल यांनी मेट्रो सेवा सुरू केल्याचे स्वागत केले. तर लखनऊमध्ये अल्ट्राव्हायोलेट तंत्राने सॅनेटाइझ केलेले टोकन दिले जात आहेत.

मास्क न वापरल्यास ५०० रु. दंड :

प्रवाशाने मास्क न वापरल्यास ५०० रुपये दंडाची तरतूद आहे. स्थानकावर गर्दी जास्त झाल्यास व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्यास तेथे मेट्रो थांबणार नाही.

बातम्या आणखी आहेत...