आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Unlock 5 Extended To Nov. 30; The Decision Was Taken By The Central Government Against The Backdrop Of Corona

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनलॉक:अनलॉक-5 मध्ये 30 नोव्हेंपर्यंत वाढ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतला निर्णय

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने याआधीच लागू केल्लाय अनलॉक 5 ची मुदत 30 नोव्हेंपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आता जी काही बंधने आहेत तीच पुढील महिनाभर कायम राहणार आहेत. अनलॉकच्या प्रक्रियेनुसार अनेक बंधन ही वगळण्यात आली असून काही बंधनेच राहिली आहेत असे केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले.

आज केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात काय खबरदारी घ्यायची आणि कोणत्या गोष्टींमध्ये सूट असेल याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यानुसार 30 सप्टेंबरला जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे 30 नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी जारी केलेल्या गाइडलाइन्सनुसार गृह मंत्रालयाने परवानगी दिलेल्या काही गोष्टी सुरु राहतील.