आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्राकडून अनलॉक-5 च्या गाइडलाइन्स जारी:15 ऑक्टोबरपासून सुरू होणार सिनेमा हॉल आणि मल्टीप्लेक्स; शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकार घेतील

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात केंद्र सरकारने अनलॉक-5 च्या गाइडलाइन्स बुधवारी जारी केल्या. सणांमुले सरकारने अनलॉक-5 मध्ये मोठी सूट दिली आहे. केंद्राने 15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल आणि मल्टीप्लेक्स सुरू करण्यास मंजूरी दिली आहे. तसेच, खेळाडूंच्या ट्रेनिंगसाठी स्वीमिंग पूलदेखील सुरू करता येतील.

अनलॉक-5 मध्ये काय सुरू होणार ?

मल्टीप्लेक्स, थिएटर आणि सिनेमाला क्षमतेच्या 50% सिटिंग कॅपेसिटीसोबत सुरू करता येणार. यासाठी केंद्र एसओपी जारी करेल.

स्कूल आणि कोचिंग संस्थांना सुरू करण्यासाठी राज्य सरकार 15 ऑक्टोबरनंतर निर्णय घेतील. परंतू, यासाठी पालकांची मंजूरी हवी.

राज्यांनी काय सवलती दिल्या ?

महाराष्ट्रात लॉकडाउन 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवला आला. 5 ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्तरॉ, फूड कोर्ट आणि बार 50% सिटिंग कॅपेसिटी सुरू केले जातील. लोकल ट्रेनमध्ये डब्बेवाल्यांना क्यूआर कोडसोबत प्रवास करण्याची परवानगी असेल. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने राज्यात सिनेमा हॉल, स्वीमिंग पूलवरील बंदी कायम ठेवली आहे.

कर्नाटकमध्ये 15 ऑक्टोबरपर्यंत स्कूल आणि कॉलेज बंद राहतील. लवकरच राज्य सरकार यावर निर्णय घेईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser