आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Unlock Process : Taj Mahal And Agra Red Fort Reopen From 21 September After 188 Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पर्यटकांसाठी खूश खबर:17 मार्चपासून बंद असलेले ताजमहाल आणि आग्रा किल्ला उद्यापासून खुले होणार, ताजमध्ये एका दिवसात फक्त 5 हजार पर्यटकांना मिळेल प्रवेश

आग्रा8 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • थर्मल स्क्रीनिंग होईल आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार
 • ताजमहलमध्ये 5 हजार आणि आग्रा किल्ल्यात 2500 पेक्षा जास्त लोकांना प्रवेश दिला जाणार नाही

आग्रा मधील दोन ऐतिहासिक स्थळे उद्यापासून पुन्हा उघडली जातील. 17 मार्चपासून बंद असलेल्या ताजमहाल आणि आग्रा किल्ला पर्यटकांसाठी खुले केले जाणार आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) अधिकाऱ्यांनी ही दोन्ही स्थळे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था केली आहे. यावेळी, कोविड - 19 च्या गाइडलाइनचे पालन करावे लागेल. 17 व्या दशकानंतर पहिल्यांदाच ताजमहाल 188 दिवस बंद होते.

आतापर्यंत तीन वेळा बंद झाला ताजमहाल

इतिहासकार राजकिशोर राजे यांच्या मते, ताजमहालची निर्मिती 1632 ते 1648 दरम्यान झाली. आतापर्यंत तीनवेळा ताज बंद करण्यात आले. पहिल्यांदा 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ताजमहाल 15 दिवस बंद होते. 1978 मध्ये पूरामुळे 7 दिवसांसाठी आणि यानंतर कोरोना व्हायरसमुळे 17 मार्चवर 15 दिवसांची बंदी लावली होती. नंतर पुढील आदेशापर्यंत ताज बंद ठेवण्यात आला.

आग्रा विभागातील 266 स्मारके बंद होती

एएसआयने आग्रा विभागातील 266 आणि आग्रा शहरातील ताजमहाल व्यतिरिक्त लाल किल्ला, महताब बाग, सिकंदरा अकबर टॉम्ब, मरियम टॉम्ब, एत्माद्दौला यासारखी आठ स्मारके बंद केली होती. यापैकी ताजमहाल आणि आग्रा किल्ला वगळता इतर सर्व स्मारके 1 सप्टेंबरपासून खुले केले होते.

एका दिवसात फक्त 5 हजार पर्यटक येऊ शकतील

ताजमहालमध्ये एका दिवसात कमला 5 हजार आणि आग्रा किल्ल्यात 2500 पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे. दोन्ही स्मारकांची तिकीट खिडकी बंद राहील. प्रवेशासाठी ऑनलाइन तिकीट खरेदी करावे लागेल. क्यूआर कोड स्कॅन करून देखील तिकीट घेता येईल. या स्मारकांमध्ये स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी)चे अनुसरण करण्याचे निश्चित केले जाईल. सीआयएसएफ पर्यटकांची तपासणी करेल. ताजमहालमधील शाहजहां आणि मुमताज यांच्या कबर पर्यटकांना पाहता येईल. मात्र मकबऱ्यात एकावेळी फक्त पाच पर्यटकांना जाता येईल.

या मार्गदर्शक तत्त्वांचे करावे लागेल पालन

 • पर्यटकांना मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागले.
 • तिकीट खिडकी बंद राहतील. ऑनलाइन तिकीटावर प्रवेश मिळेल.
 • पार्किंगसह सर्व पेमेंट डिजिटली करावे लागेल.
 • भिंती आणि रेलिंगपासून दूर रहावे लागेल.
 • प्रवेशापूर्वी थर्मल स्क्रीनिंग होईल. लक्षणे नसणाऱ्यांना प्रवेश दिला जाईल.
 • स्मारकात ग्रुप फोटोग्राफीला परवानगी मिळणार नाही.
 • प्रवेश तिकिटासाठी परदेशीयांना 1100 रुपये आणि देशातील पर्यटकांना 50 रुपये मोजावे लागतील.
बातम्या आणखी आहेत...