आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Unlock Some States In The Country; Delta Raises Challenge Again; News And Live Updates

कोरोना संकट:देशातील काही राज्ये अनलॉक; डेल्टाने वाढवले पुन्हा आव्हान; महाराष्ट्र, हिमाचलसारख्या राज्यात लॉकडाऊन सुरूच

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात तेलंगणा झाले होते पहिल्यांदा अनलॉक

तेलंगणात २० जूनपासून लॉकडाऊन पूर्णपणे हटवण्यात आले होते. त्यानंतर महामारीदरम्यान पूर्ण निर्बंध हटवणारे तेलंगणा देशातील पहिले राज्य ठरले होते. १ जुलैपासून शाळा सुरू करण्याची तयारी आहे, परंतु जगासाठी चिंतेचे कारण ठरणारा डेल्टा व्हेरिएंट देशातील इतर राज्यांची स्थिती बिघडवू पाहतोय. भारतात ५१ रुग्ण आढळून आले आहेत. केंद्र सरकारने ८ राज्यांशी याबाबत दक्षता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यानंतर सरकारने पुन्हा निर्बंध लागू केले आहेत.

हरियाणात लाॅकडाऊन ५ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. बंगालमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बिहारमध्ये रात्री संचारबंदीसह इतर निर्बंधासह लॉकडाऊन संपुष्टात आला आहे. उत्तर प्रदेशनेदेखील ७५ जिल्ह्यांत नियमांत सवलत दिली आहे. परंतु काही राज्यांता कोरोनाचे संकट कायम आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे देशातील सर्वाधिक २२ रुग्ण आढळले आहेत. पूर्वी डेल्टा व्हेरिएंटचेदेखील रुग्ण आढळले होते. राज्यात एकूण २०.५ टक्के लोकांनी लसीचा एक डोस, तर ४.९ टक्के लोकांनी दोन डोस घेतले आहेत. महाराष्ट्रात संसर्गाचा दर ४.२ टक्के आहे.

राज्यातील काही राज्यांची स्थिती

पश्चिम बंगालमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन
बंगालमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. बस, मेट्रो, लोकल ट्रेन पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. रेस्तराँ दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहील. उद्यानात केवळ लस घेतलेल्या लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. बंगालमध्ये उत्तर व दक्षिण २४ परगणा, कोलकाता, हावडा व हुगळी सर्वाधिक बाधित जिल्हे आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १६.८ टक्के लोकांना एक डोस, ४.९ टक्के लोकांना दोन्ही डोस दिले. राज्यात संसर्ग दर ३.६ टक्के आहे.

राजस्थानमध्ये स्टाफला लस देणाऱ्या जिमला परवानगी
राजस्थानमध्ये २८ जूनपासून सार्वजनिक ठिकाणी सहभागी होण्यासाठी लोकांना किमान एक डोस देणे अनिवार्य केले. दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहतील. जिम व रेस्तराँपैकी ६० टक्क्यांहून जास्त अधिक कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे.

हरियाणात लॉकडाऊन ५ जुलैपर्यंत वाढवले
हरियाणा सरकारने रविवारी लॉकडाऊन ५ जुलैपर्यंत वाढवले आहे. राज्यात ८ व्यांदा लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. राज्यात सर्व दुकाने सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मॉल सकाळी १० पासून रात्री ८ पर्यंत सुरू राहतील.

गोवा : ४८.६ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला
गोव्यात लॉकडाऊन ५ जुलैपर्यंत वाढवण्यात आले आहे. सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ पर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवता येतील. गोव्यातील विवाह समारंभांनादेखील परवानगी देण्यात आली आहे. एकूण ४८.६ टक्के लोकांना एक डोस व ७ टक्के जणांना दोन डोस दिले आहेत.

तामिळनाडूत धार्मिक ठिकाणे सुरू, सणाची परवानगी नाही
तामिळनाडूत ५ जुलैपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. चेन्नई, कांचीपुरम, चेंगलपट्टू व तिरुवल्लुवरमध्ये खासगी कंपन्यांत १०० टक्के कर्मचाऱ्यांसोबत काम करेल. राज्यात एकूण १६.४ टक्के लोकांनी लसीचा एक डोस घेतला आहे. ३.३ टक्के लोकांना डोस मिळाला.

बातम्या आणखी आहेत...