आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Until The Election Comes, Trinamool Will Be Empty, Only Didi Will Be Left. Amit Shah

मिदनापूर:निवडणुका येईपर्यंत तृणमूल रिकामी होणार, एकट्या दीदीच राहणार, प. बंगालमध्ये अमित शहांचा घणाघात

मिदनापूर (प. बंगाल)7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालमध्ये सत्तारूढ तृणमूल काँग्रेसला (टीएमसी) भाजपने चांगलाच झटका दिला आहे. दोनदिवसीय बंगाल दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची पश्चिम मिदनापूरमध्ये शनिवारी सभा झाली. यात खासदार सुनील मंडल, माजी खासवार दशरथ तिर्की आणि १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पैकी ५ आमदार एकट्या टीएमसीचे आहेत. पक्षांतर करणाऱ्यात सीएम ममता बॅनर्जींचे विश्वासू शुभेंदू अधिकारी यांचाही समावेश आहे. त्यांनी आमदारकी सोडली असती तरी अद्याप त्यांचा राजीनामा मंजूर झालेला नाही.

सभेत शहांनी ममतांवर टीका करत राज्यात राजकीय हिंसाचाराचा आराेप केला. ते म्हणाले, दीदी भाजपवर पक्षांतराचा आरोप करतात. जेव्हा त्या काँग्रेस सोडून तृणमूलमध्ये आल्या तेव्हा काय होते? निवडणूक येईपर्यंत तृणमूल रिकामी होऊन जाईल व दीदी एकट्याच उरतील. २९४ सदस्यीय विधानसभेच्या आगामी निवडणुकांत भाजप २०० पेक्षा जास्त जागा जिंकून राज्यात सरकार स्थापन करेल, असा दावाही गृहमंत्री अमित शहा यांनी केला.

यांचा भाजपमध्ये प्रवेश
शुभेंदू अधिकारी, शीलभद्र दत्ता, विश्वजित कुंडू, शुक्र मुंडा, बनाश्री मैती, सैकत पंजा (सर्व टीएमसी आमदार), तापसी मंडल (सीपीएम आमदार), अशोक डिंडा (सीपीआय आमदार), सुदीप मुखर्जी(काँग्रेस आमदार) आणि दीपाली बिस्वास (सीपीएम आमदार).

बातम्या आणखी आहेत...