आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • UP Accident Prayagraj Lucknow Highway Vehicle Returning Marriage Collided With Truck, UP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

UP मध्ये भीषण अपघात:​​​​​​​लग्नावरुन परतत असलेल्या वऱ्हाडाची भरधाव जीप उभ्या ट्रकला धडकली, 6 बालकांसह 14 लोकांचा मृत्यू

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेविषयी दुःख व्यक्त केले.

उत्तरप्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात गुरुवारी रात्री रस्ते अपघातात 14 लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये सहा मुलांचा समावेश होता. पोलिसांचा अंदाज आहे की, ड्रायव्हरला डुलकी लागली होती. जीपचे एवढे नुकसान झाले आहे की, त्याचे दरवाजे कटरने कापून मृतदेह बाहेर काढावे लागले.

पोलिसांनी सांगितले की, मृतांमध्ये 12 कुंडा कोतवालीच्या चौंसा जिरगापुर गावातील होती. ड्रायव्हर आणि एक नऊ वर्षांचा मुलगा दुसऱ्या गावाचे होते. ते नवाबगंज पोलिस स्टेशन परिसरात शेखपुरा गावात लग्नासाठी गेले होते. अपघात मानिकपूर स्टेशन परिसरात प्रयागराज हायवेवर झाला. जोरदार धडकेचा आवाज ऐकून आजुबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना फोन केला आणि बचाव कार्यास सुरुवात झाली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेविषयी दुःख व्यक्त केले. त्यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळावर पोहोचणे आणि पीडित कुटुंबांना शक्य असेल ती मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.

मृतांची नावे
पारसनाथ (ड्राइव्हर) (40), मिथिलेश कुमार (17), बबलू (22), अभिमन्यु (28), रामसमुझ (40), नान भैया (55), दयाराम (40), दिनेश (40), पवन (10), अमन (7), अंश (9), गौरव (10), सचिन (12) आहे हिमांशु (12) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...