आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेलगाम गुन्हेगार:यूपी : आता गोंडामध्ये सैतानी कृत्य, तीन मुलींवर अॅसिड फेकून हल्ला, हाथरसनंतर हृदय पिळवटून टाकणारी आणखी एक घटना

गोंडा/ हाथरस2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजकारण : कायदा-व्यवस्थेवर विराेधक-सरकार यांच्यात संघर्ष

उत्तर प्रदेशात हाथरसनंतर आता गाेंडामध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. गाेंडामध्ये एका दलित कुटुंबातील तीन मुलींवर अॅसिड हल्ला झाला. तिन्ही बहिणींना गाेंडाच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी सर्वात माेठी बहीण १७, मधली १२ तर धाकटीचे वय ८ वर्षे आहे. पाेलिस अधीक्षक शैलेशकुमार पांडेय म्हणाले, जिल्ह्यातील पसका गावात साेमवारी रात्री तिघी बहिणी छतावर झाेपल्या हाेत्या. त्याच वेळी अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अॅसिड हल्ला केला. त्यात या तिघीही गंभीर जखमी झाल्या. हाेरपळल्या. माेठी मुलगी ३० टक्के जळाली. पाेलिसांनी अज्ञात आराेपींच्या विराेधात गुन्हा दाखल केला. घटनेत आजूबाजूच्या लाेकांचा हात असण्याची शक्यता वर्तवली जाते. कुटुंबाने आतापर्यंत कुणावरही संशय व्यक्त केलेला नाही. त्याचबराेबर घटनेमागील कारणदेखील समजू शकलेले नाही. पीडितांचे वडील राम अवतार गावात कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. माेठ्या मुलीचा विवाह ठरला हाेता. अॅसिड हल्ल्याने तिचा चेहरा जळाला. तिचे लग्न कसे हाेणार काेण जाणे, असे वडील म्हणाले.

राजकारण : कायदा-व्यवस्थेवर विराेधक-सरकार यांच्यात संघर्ष
सरकार : आम्ही गुन्हेगारीला जातीच्या चष्म्यातून पाहत नाही -गृह राज्यमंत्री

केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले, रालाेआ सरकार गुन्हेगारीकडे जात, पंथ किंवा प्रांत अशा चष्म्यातून पाहत नाही. सरकार महिलांना तसेच दलितांच्या विराेधात गुन्हे खपवून घेणार नाही. सर्व पीडितांसाठी लवकरच निर्णायक न्याय निश्चित केला जाईल. तशी पावले उचलली जातील. आॅल इंडिया काॅन्फरन्स आॅफ डायरेक्टर्स, फिंगरप्रिंट ब्यूराे-२०२० च्या डिजिटल उद्घाटनप्रसंगी रेड्डी बाेलत हाेते.

विराेधक : सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालतेय - काँग्रेसचा आराेप
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी गाेंडा घटनेवरून उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली. त्यांनी साेशल मीडियावर पीडित मुलीच्या वडिलांचे वक्तव्य पाेस्ट केले. या व्यक्तीच्या तीन मुली घरात झाेपलेल्या हाेत्या. कुणीतरी घरात घुसून तेजाब फेकून निघून गेले, अशी कॅप्शन त्यांनी लिहिली आहे. त्याचबराेबर यूपी सरकार महिलाविराेधी गुन्हेगारांना याेग्य ठरवत आहे. त्यांना वाचवू पाहतेय. या राजकारणामुळे गुन्हेगार चेकाळले आहेत.

हाथरस प्रकरण : सीबीआय टीम घटनास्थळी पाेहाेचली, पीडितेच्या आई-भावाची मदत
तरुणीवरील सामूहिक अत्याचार प्रकरणात सीबीआयची टीम मंगळवारी हाथरसला दाखल झाली. टीम ६ वाहनांतून पाेहाेचली. त्यात १५ अधिकारी हाेते. अधिकारी म्हणाले, टीमने घटनास्थळाची पाहणी केली. येथे १४ सप्टेंबरला घटना घडली हाेती. पाेलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील १५ किमीच्या भागाला प्रवेशबंदी केली आहे. टीमने पीडितेचे भाऊ तसेच आईच्या मदतीने घटनास्थळाची खात्री करून घेतली. पीडितेला जाळण्यात आलेल्या भागालाही टीमने भेट दिली. सीबीआयसाेबत फाॅरेन्सिक टीमचीही उपस्थिती हाेती. पीडितेच्या आई-वडिलांची प्रकृती बिघडली आहे. आई रुग्णालयातून घटनास्थळी पाेहाेचली हाेती. या प्रकरणातील ते महत्त्वाचे साक्षीदार आहेत. हाथरसचे पाेलिस अधीक्षक विनीत जायस्वाल म्हणाले, सीबीआय टीमने तपासादरम्यान संकलित केलेले पुरावे व केस डायरीसह इतर दस्तएेवज मागवले हाेते.

यूपी : महिनाभरात अत्याचारानंतर हत्येच्या तीन माेठ्या घटना
१४ सप्टेंबर : हाथरसमध्ये दलित तरुणीवर सामूहिक अत्याचाराचे प्रकरण. प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णालयात मृत्यू.
१ आॅक्टाेबर : बलरामपूरमध्ये अपहरण करून दलित तरुणीवर अत्याचार. पीडितेचा मृत्यू.
२ आॅक्टाेबर : भदाेहीमध्ये १४ वर्षीय दलित मुलीची हत्या झाली. लैंगिक शाेषण झाल्याचा कुटुंबीयांचा संशय.
१२ आॅक्टाेबर : गाेंडामध्ये एका दलित परिवारातील तीन बहिणींवर अॅसिड हल्ला.

बातम्या आणखी आहेत...