आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Up Assembly Election 2022 | Marathi News | BJP Candidate List UP Election 2022 LIVE Update; Yogi Adityanath, Deputy CM Maurya Contest Vidhan Sabha Chunav

यूपी विधानसभा:भाजपची पहिली उमेदवारी यादी जाहीर, योगी आदित्यनाथ गोरखपुरातून, तर केशव प्रसाद मौर्य प्रयागराजमधून निवडणुकीच्या रिंगणात

नवी दिल्ली3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जारी केली आहे. त्यात 107 जणांचा समावेश आहे. भाजपच्या या पहिल्या यादीत अनेक माजी आमदारांची उचलबांगडी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपुरातून तर प्रयागराजमधून केशव प्रसाद मौर्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

बीजेपीने जारी केलेल्या आपल्या पहिल्या यादीत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या उमेदवारांचे नाव आहेत. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, आज जारी करण्यात आलेल्या पहिल्या यादीत पहिल्या टप्प्यातील 58 पैकी 57 तर दुसऱ्या टप्प्यातील 55 पैकी 48 उमेदवारांची यादी जारी करण्यात आली आहे. उर्वरित उमेदवारांच्या नावावर सध्या चर्चा सुरू आहे. त्यावर अंतिम निर्णय केंद्र समिती घेणार असल्याचे प्रधान यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...