आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर प्रदेश विधानसभा निवडुणकीत काँग्रेसचा दुसरा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये एका प्रश्नाचे उत्तर देताना काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार यावर प्रियंका गांधींनी मजेशीर उत्तर दिले. तुम्हाला दुसरे कुणी दिसतात का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
यूपीच्या जनतेसाठी काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांचे मॅनिफेस्टो अर्थातच जाहीरनामा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने युवा पिढी आणि महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला आहे. आपण युवकांशी संवाद साधूनच हा जाहीरनामा बनवल्याचा दावा यावेळी प्रियंका गांधींनी केला. यानुसार, उत्तर प्रदेशात काँग्रेसची सत्ता आल्यास 20 लाख लोकांना नोकऱ्या दिल्या जातील. त्यातील 8 लाख जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या जातील. विशेष म्हणजे, राज्य सरकारमध्ये 12 लाख पदे आताच रिक्त आहेत. त्यामुळे, नोकऱ्या देण्याचे काम झपाट्याने सुरू केले जाईल असे प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या आहेत.
आम्हाला ध्रुवीकरणात जायचे नाही
प्रियंका गांधी पुढे बोलताना म्हणाल्या, प्रत्यक्ष निवडणूक लढवण्याचा अद्याप निर्णय झाला नाही. तरीही आपणच काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहोत हे त्यांनी अप्रत्यक्षरित्या मान्य केले आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीची (यूपीए) सत्ता असताना सरकारचा रेकॉर्ड भाजपच्या तुलनेत चांगलाच होता. भाजपने छोट्या व्यापाऱ्यांना संपवले आहे. नोटबंदी आणि चुकीचे GST धोरण लागू करून लघू आणि मध्यम उद्योगांना लक्ष्य केले. मोजक्या धनाढ्य व्यापाऱ्यांच्या हातात देश सोपविणे हेच भाजपचे धोरण आहे. आम्ही ध्रुवीकरण करत नाही. पण, जनतेने जागरुक होणे हे सर्वात महत्वाचे आहे. यूपीत दर 24 तासात 880 लोकांचे रोजगार जातात. 16 लाख लोकांनी रोजगार गमवला.
यासोबतच प्रियंका गांधी महिलांसाठी वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात महिलांना मोफत बस सेवा, वर्षातून तीन एलपीजी गॅस सिलेंडर मोफत आणि सरकारी नोतकऱ्यांमध्ये 40% आरक्षणाचे आश्वासन देण्यात आले आहे. प्रियंका गांधी यूपीत आपल्या पक्षातील महिलांना तिकिटांत 40% आरक्षण देत आहेत.
जाहीरनामा प्रसिद्ध करताना त्या पुढे म्हणाल्या, परीक्षांचे पेपर लीक होत असल्याने युवक त्रस्त झाले आहेत. युवा वर्गात नैराश्य आहे. आमची सत्ता आल्यास आम्ही सर्व आश्वासने पूर्ण करू. सकारात्मक प्रचार, विकास व्हावा आणि युवकांच्या भवितव्यावर चर्चा व्हावी. यासोबतच, युवक आपला रोजगार कसा सुरू करू शकतात यावरही मागर्दर्शन करण्यात आले आहे. हा जाहीरनामा उत्तर प्रदेशातील 7 कोटी युवा लोकांसाठी आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
जाहीरनामा प्रसिद्ध करताना राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला. भारताला नव्या दृष्टीकोनाची गरज आहे. हाच नवीन दृष्टीकोन आहे. भाजपमध्ये त्यांचे व्हिजन फेल होताना दिसत आहे. अशात यूपीमध्ये आम्ही नवीन व्हिजनची सुरुवात करणार आहोत. नव्या संकल्पना मांडणार आहोत.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नेमके काय?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.