आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायूपीच्या बदायूंमधून एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. इथे एका व्यक्तीविरोधात उंदीर मारल्याप्रकरणी 30 पानी आरोपपत्र दाखल झाले आहे. मनोज असे आरोपी व्यक्तीचे नाव असून विक्रेंद्र नावाच्या प्राणी प्रेमी व्यक्तीच्या तक्रारीवरून हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. उंदीर मारल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल होण्याचे हे देशातील पहिले प्रकरण असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
25 नोव्हेंबर 2022 ची घटना
याविषयी सविस्तर वृत्त असे की, बदायूंच्या कोतवाली ठाण्यातील पनवडिया गल्लीत राहणाऱ्या मनोज नावाच्या व्यक्तीने 25 नोव्हेंबर 2022 रोजी घरात शिरलेला एक उंदीर पकडून त्याच्या शेपटीला दगड बांधून त्याला नालीत फेकले. तेव्हा तिथून प्राणी प्रेमी विकेंद्र जात होता. त्याने हे सर्व बघितले. त्याने मनोजला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र मनोजने ऐकले नाही. मनोज तिथून गेल्यावर विकेंद्रने उंदराला नालीतून बाहेर काढले आणि त्याचा व्हिडिओही बनवला.
प्राणी प्रेमीने केली तक्रार
नंतर त्याने मनोजविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी मनोजला पोलिस ठाण्यात बोलावले. 7-8 तास ठाण्यात ठेवून त्याला सोडून दिले. दरम्यान विकेंद्रने उंदराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दबाव निर्माण झाल्यावर मनोजविरोधात 28 नोव्हेंबर रोजी पशू क्रुरतेतील कलमांनुसार केस नोंदवण्यात आली. या प्रकरणी मनोजला ठाण्यातूनच जामीन देण्यात आला.
तक्रारदाराने शवविच्छेदनाचा खर्च उचलला
तक्रारदार विकेंद्रने उंदराच्या शवविच्छेदनाचा खर्चही स्वतःच केला. बरेली आयव्हीआयआरमध्ये उंदराच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. यात उंदराच्या फुफ्फुसांना सूज तसेच यकृताला संसर्ग आढळून आला. तर फुफ्फुसात नालीच्या पाण्यासारखे अवशेष आढळले नाही. उंदराचा मृत्यू गुदमरल्याने झाल्याचे यात निष्पन्न झाले. यावरून दावा करण्यात आला की, उंदराच्या हत्येची गोष्ट चूकीची आहे.
आरोपी मनोज म्हणाला- बकरी, कोंबडी कापणाऱ्यांवरही केस व्हावी
आरोपी मनोजसोबत दिव्य मराठी नेटवर्कने 30 नोव्हेंबर रोजी संपर्क केला होता. तेव्हा तो म्हणाला होता की, मी कोणताही गुन्हा केला नाही. जर केलाही असेल तर त्याविषयी माफीही मागितली आहे. मात्र मला एक सांगा जे लोक कोंबडी, बकरी कापतात त्यांना शिक्षा कधी होईल. माझ्या घरात उंदराने केलेल्या नुकसानीची भरपाई कोण करणार.
ही बातमीही वाचा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.