आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • UP Bihar Coronavirus Latest Updates; COVID Patients Dead Body Found Floating In Ghazipur And Buxar; News And Live Updates

यूपीतून वाहत-वाहत बिहारला पोहचले मृतदेह?:गाझीपुरच्या गंगा घाटावर सापडले 52 मृतदेह; आतापर्यंत 110 पेक्षा जास्त मृतदेहांना काढले बाहेर; बलियामध्ये 12 हून अधिक मृतदेह आढळले

गाझीपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'दैनिक भास्कर'च्या टीमने स्वत: या मृतदेहांची मोजणी केली आहे.

बिहारमधील बक्सर येथे गंगा नदीच्या किनार्‍यावर काल आढळलेल्या मृतदेहांमुळे देशात खळबळ उडाली होती. दरम्यान, तेथील मृतदेहांची संख्या अद्याप पूर्णपणे मोजता आली नव्हती. तर उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील गंगा नदीच्या घाटावर अवघ्या 800 मीटर अंतरावर 52 मृतदेह सापडले आहे. 'दैनिक भास्कर'च्या टीमने स्वत: या मृतदेहांची मोजणी केली आहे. त्यामुळे आतापर्यंत या आढळलेल्या मृतदेहांचा आकडा 110 वर पोहचला असून यामध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. दुसरीकडे बलियामध्ये गंगा नदीच्या किनार्‍यावर 12 पेक्षा जास्त मृतदेह आढळून आले आहे.

बक्सरमधील हे मृतदेह यूपीतून वाहत गेले असल्याची भीती आता व्यक्त केली जात आहे. कारण गंगा नदी गाझीपूर आणि बलिया मार्गे बक्सरकडे जाते. काल रात्रीपासून प्रशासनाने 80 ते 85 मृतदेह गंगेच्या बाजूला दफन केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. परंतु, प्रशासनाकडून याची संख्या 24 सांगितली जात आहे.

डीएम यांनी चौकशी समिती स्थापन केली
गाझीपूरच्या गहमार आणि करंडा भागात गंगेच्या काठी मृतदेह पाहून लोक काळजीत पडले आहे. दरम्यान जिल्हाधिकार्‍यानी संबंधित प्रकरणात चौकशी समितीची स्थापना केली असून एडीएम सिटीच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. याशिवाय आणखी एक देखरेख समिती गठित केली गेली आहे, जी गंगेतील मृतदेहांच्या प्रवाहावर नजर ठेवणार आहे.

बातम्या आणखी आहेत...