आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपी:भगतसिंगांच्या भूमिकेत फाशी लागून मुलाचा मृत्यू, 15 ऑगस्टची होती तयारी सुरू

बदायूं2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घटनास्थळी उपस्थित मुलाला आधी वाटले मित्र अभिनय करतोय

उत्तर प्रदेशात स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाची तयारी करणाऱ्या १० वर्षांच्या शिवमचा मृत्यू झाला. तो भगतसिंगांच्या फाशीच्या दृश्याचा सराव करत होता. तेव्हाच स्टूलवरून पाय घसरला आणि गळ्याला फास लागला. घटना बदायूंतील बाबत गावातील आहे.

शिवमच्या नातेवाइकाने सांगितले की, गावातील काही मुले मिळून १५ ऑगस्टला शाळेत नाटक बसवायची तयारी करत होती. यात शिवमला शहीद भगतसिंग यांची भूमिका करायची होती. त्याचा एक मित्र गुरुवारी नाटकाचा सराव करण्यासाठी त्याच्या घरी आला होता. या वेळी भगतसिंगला फाशी देत असल्याच्या दृश्यासाठी शिवम फास बनवून स्टूलवर उभा होता. मात्र, अचानक त्याचा पाय घसरला. त्यात फास आवळला गेला. त्याला श्वास घेता येत नव्हता. शिवमच्या मित्राला वाटले तो अभिनय करतोय. मात्र शिवमचा श्वास बंद झाला तेव्हा तो मदतीसाठी घराबाहेर धावला. कुटुंबीय व गावातील लोक येईपर्यंत शिवमचा मृत्यू झाला होता.

न सांगताच कुटुंबीयांनी केले अंत्यसंस्कार
पोलिसांनुसार कुटुंबीयांनी घटनेची माहिती दिली नाही व न सांगताच मुलावर अंत्यसंस्कारही केले. म्हणून घटनेची प्रत्येक बाजूने चाैकशी करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...