आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

यूपीतील अपहरण:पाेलिसांना काही सांगू नकाे, विकासदुबेची गत काय झाली माहितेय ना? - महिलेची धमकी

गाेंडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्य कर्मचारी हाेऊन मुलाचे केले होते अपहरण, सुदैवाने व्यापाऱ्याच्या सहा वर्षीय मुलाची सुटका

गुन्हेगारीच्या वाढत्या घडामाेडींमुळे बदनाम हाेत असलेल्या उत्तर प्रदेश पाेलिसांच्या हाताला यश आले आहे. गाेंडा येथील किराणा व्यावसायिकाच्या अपहृत मुलाची शनिवारी पाेलिसांनी सुखरूप सुटका केली. पाेलिसांनी या प्रकरणात पाच गुंडांना अटकदेखील केली आहे. या प्रकरणातील आॅडिआे चर्चेत आला आहे. त्यात खंडणी मागणारी महिला यूपी पाेलिसांबद्दल सांगते. पाेलिस कुणाचेच नसतात. त्यांच्याकडे जाऊन काय हाेऊ शकते, हे विकास दुबेची काय गत झाली यावरून समजले असेल, असा इशारा या महिलेने दिला हाेता. पाेलिस अधिकारी प्रशांत कुमार अपहरणाबद्दल म्हणाले, गुप्त माहितीवरून गुंड पारा गावात दडून बसल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार पाेलिस तेथे पाेहाेचले. तेव्हा त्यांची गुंडांसाेबत चकमक उडाली. अपहरणकर्ते मुलास एका वाहनाने दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात हाेते. आराेपींनी मुलाच्या बदल्यात ४ काेटी रुपयांची खंडणी मागितली हाेती.

या घटनेत सूरज पांडे, पत्नी छवी पांडे, राज पांडेय, उमेश यादव, दीपू कश्यप अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. दीपू व उमेश पाेलिसांची गाेळी लागल्याने जखमी झाले आहेत. गुंडांकडून एक पिस्तूल व काडतूसे याशिवाय दारूगाेळा जप्त करण्यात आला. सूत्रांच्या म्हणण्यानुसार छवी पांडेने फाेन करून ६ वर्षीय नमाेचे वडील हरी गुप्ता यांच्याकडे ४ काेटी रुपयांची खंडणी मागितली हाेती.

यासंबंधी छवी हिचा आॅडिआे देखील समाेर आला आहे. त्यात ती खंडणी मागताना एेकायला मिळते. धमकीच्या स्वरात छवी म्हणते- पाेलिसांकडे जायचे असल्यास जा. परंतु, तुझा मुलगा मिळणार नाही. कानपूरच्या विकास दुबेची काय गत झाली, माहितेय ना. पाेलिस काेणाचीही नसते. खंडणी देणार की नाही याचे उत्तर हाे किंवा नाही असे असले पाहिजे.’दरम्यान, अपर मुख्य सचिव (गृह) अवनीश अवस्थी यांनी मुलाची सुखरूप सुटका करणाऱ्या पाेलिस पथकाला या कामगिरीबद्दल २ लाख रुपयांच्या बक्षिसाची घाेषणा केली. गाेंडाच्या कर्नलगंजमध्ये दाेन जणांनी स्वत:ची आराेग्य कर्मचारी अशी आेळख सांगून मास्क व सॅनिटायझर वाटपाच्या बहाण्याने मुलाचे अपहरण केले हाेते. काही वेळाने गुंडांनी व्यापाऱ्याला माेबाइलवरून ४ काेटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली हाेती.