आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • UP Chief Minister Yogi Adityanath Arrives At Deputy Chief Minister Maurya's House, Nitish Leaves For Delhi; Sidhu In Punjab, Chirag Paswan In Bihar

मान्सूनमध्ये राजकीय सरीवर सरी:यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपमुख्यमंत्री मौर्यांच्या घरी दाखल, नितीश दिल्लीला रवाना; पंजाबमध्ये सिद्धू, बिहारमध्ये चिराग पासवान यांचा हट्ट

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदींना पीडितांचे अश्रू पुसता येत नाहीत : राहुल
  • भाजपचे उत्तर - काही चांगले झाले की काँग्रेसला त्रास

मान्सूनदरम्यान देशभरात ठिकठिकाणी राजकारणाच्या हलक्या, मध्यम तसेच मुसळधार सरी कोसळू लागल्या आहेत. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या हालचाली दिसू लागल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार केंद्रात भागीदारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. पंजाबमध्येही काँग्रेसचा कलह सुरू आहे.

यादरम्यान राजकारणासाठी कोरोनादेखील अपवाद ठरला नाही. सर्वात आधी उत्तर प्रदेशबद्दल बोलू. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंगळवारी अचानक उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या घरी पोहोचले. गेल्या काही दिवसांत उभय नेत्यांत मतभेद झाल्याचे वृत्त होते. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. आगामी विधानसभा निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल, याचा निर्णय भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व करेल, असे वक्तव्य मौर्य यांनी गेल्या आठवड्यात केले होते. या विधानानंतर उभय नेत्यांमधील दरी वाढल्याचे विश्लेषकांना वाटते. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मौर्य प्रदेशाचे अध्यक्ष होते. विजयात त्यांची भूमिका महत्त्वाची मानण्यात आली होती. योगी यांचे मौर्य यांच्या घरी जाणे एक कारण मानले जात आहे. भाजपचे प्रदेश प्रभारी राधामोहन सिंग व राष्ट्रीय महामंत्री बी.एएल संतोष लखनऊच्या दौऱ्यावर आहेत.

पंजाब: समितीसह अमरिंदर यांची बैठक, समेटासाठी चर्चा
पंजाब काँग्रेसमधील संघर्ष दूर करण्यासाठी तीन सदस्यीय समितीने मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्यासोबत चर्चा केली होती. ही चर्चा तीन तास चालली. समितीने अलीकडेच मुख्यमंत्री अमरिंदरसिंग, माजी मंत्री नवज्योतसिंग सिद्धू व अनेक मंत्री, खासदार, आमदारांसह काँग्रेसचे पंजाबसंबंधी १०० हून जास्त नेत्यांचे मत जाणून घेतले होते.

बिहार : कॅबिनेटमध्ये सहभागी होण्याची शक्यता
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार दिल्लीला रवाना झाले आहेत. जदयू केंद्रीय कॅबिनेटमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नितीश दिल्ली रालाेआच्या आघाडीच्या नेतृत्वाशी विचारविनिमय करतात. पक्षाचे नेते आरपी सिंह म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर जदयू रालोआतील घटक पक्ष या नात्याने भागीदारी घेईल.

मोदींना पीडितांचे अश्रू पुसता येत नाहीत : राहुल
काँग्रेसने कोरोना व्यवस्थापनासंबंधी मंगळवारी श्वेतपत्रिका जाहीर केली. केंद्र सरकारने तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सगळी तयारी करावी. याप्रसंगी राहुल गांधी यांनी केंद्रावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या लाटेत आप्त गमावणाऱ्यांच्या नातेवाइकांचे अश्रू पुसू शकत नाहीत. पंतप्रधान त्यांच्यासमवेत उभे नव्हते.

भाजपचे उत्तर - काही चांगले झाले की काँग्रेसला त्रास
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, कोरोना लढाईतील निर्णायक वळण येताच राहुल गांधी यांनी राजकारणाचा प्रयत्न केला आहे. देशात काही चांगले होत असल्याचे दिसताच काँग्रेसचा पारा चढतो. दिल्लीत लसीकरण कमी होत असल्यावरून केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी टोला लगावला.

बातम्या आणखी आहेत...