आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • UP CM Yogi Adityanath Cabinet Exclusive | CM Yogi Ministers List | Yogi Adityanath Cabinet Minister, Deputy CM In UP

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:यूपीत योगींचे प्रोफेशनल्सचे कॅबिनेट, मंत्रिपदासाठी असतील हे तीन निकष; जे पूर्तता करणार तेच मंत्री होणार

लेखक: प्रेम प्रताप सिंह2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूपीच्या सत्तेत दमदार पुनरागमन करूनही योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला उशीर का लागत आहे? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. वास्तविक, यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या धर्तीवर योगींच्या मंत्रिमंडळाला प्रोफेशनल टच देण्याची तयारी सुरू आहे. या प्रक्रियेशी संबंधित भाजपच्या एका अधिकाऱ्याने 'भास्कर'ला सांगितले की, अशा आमदारांना कॅबिनेट मंत्री केले जाईल, ज्यांना राजकीय अनुभव तसेच जातीय, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षमता आहे. हायकमांड स्तरावर रिझ्युमचे स्क्रीनिंग सुरू असल्याने वेळ लागत आहे. 2024 मध्ये यूपीच्या लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी ही संपूर्ण कसरत केली जात आहे. लोकसभेची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे, असेही म्हणता येईल.

असे आहेत आमदारांच्या मंत्रिपदाचे निकष...

जातीय समीकरण: जातीय जनाधार साधण्यात योग्य असलेल्या अशा आमदारांना निवडण्याची तयारी सुरू आहे. बसपाच्या जाटव व्होटबँकेला हिसकावण्यात भाजपने यश मिळवल्याचे निवडणूक निकालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जाटव मते टिकवण्यासाठी सरकारमध्ये जाटव समाजातून दोन-तीन मंत्री केले जाऊ शकतात. त्याचबरोबर पक्षाच्या विजयात महिलांचाही मोठा वाटा असल्याने त्यांनाही मंत्रिमंडळात पुरेसे प्रतिनिधित्व मिळणार आहे.

शैक्षणिक पार्श्वभूमी : आमदारांची शैक्षणिक पात्रता आणि कर्तृत्वाचीही चाचणी घेतली जात आहे. याद्वारे भाजप सुशिक्षितांना जनतेत पाठवून स्वच्छ राजकारणाचा नवा पायंडा पुढे पाडायचा आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहे. या माध्यमातून अधिकाधिक बुद्धिजीवी वर्गाला जोडणे हे पक्षाचे ध्येय आहे. पक्षाचा असा विश्वास आहे की, बुद्धिजीवी ज्वलंत मुद्द्यांवर आवाज उठवत आहेत. यामुळे एक नॅरेटिव्ह तयार करण्यात मदत मिळेल.

सब्जेक्ट एक्स्पर्ट : अशा आमदारांची नावे निवडली जात आहेत, जे एक किंवा दोन विषयात तज्ज्ञ आहेत. त्यांच्याशी संबंधित विभाग त्यांना दिला जाईल, जेणेकरून ते लोकांपर्यंत योजना जलद पोहोचवू शकतील. केंद्रात ज्याप्रकारे कॅबिनेट मंत्र्यांना आदेश देण्यात आला आहे, त्यावरून सरकारसोबत संघटनेचा अजेंडा पूर्ण करण्याचा दबावही त्यांच्यावर असेल.

मंत्र्यांना दिले जाणार टार्गेट

योगी सरकारच्या नव्या मंत्र्यांना त्यांच्या संबंधित मंत्रालयांचे टार्गेट दिले जाणार आहे. लक्ष्यानुसार कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांचाही आढावा घेतला जाईल. रविवारी गोरखपूरहून परतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली. त्याचबरोबर मंत्रिमंडळ स्थापनेबाबत पीएमओ स्तरावरून आमदारांचे मॅपिंगही केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे, जेणेकरून कोणत्याही स्तरावर चुकीचा संदेश जाऊ नये.

मंत्रिमंडळ स्थापनेसंदर्भात योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीत अनेक बैठका घेतल्या.
मंत्रिमंडळ स्थापनेसंदर्भात योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीत अनेक बैठका घेतल्या.

काय आहे भाजपचा हेतू?

वास्तविक, भाजप 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून आहे आणि यूपीच्या 80 जागांवर डोळा ठेवून सर्व समीकरणे तयार केली जात आहेत. तयारी अशी आहे की योगींच्या शपथविधीच्या भव्य कार्यक्रमासोबतच महाअभियान 2024 देखील सुरू होणार आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याच धर्तीवर मोदी मंत्रिमंडळाचाही विस्तार करण्यात आला होता, ज्यामध्ये जातीय समीकरणांसह प्रोफेशनल्सचा समावेश करण्यात आला होता. तोच कित्ता आता यूपीत गिरवला जात आहे.

यूपीमध्ये उपमुख्यमंत्रिपदावरून पेच

यूपीमध्ये उपमुख्यमंत्री पदावरून सस्पेंस कायम आहे. संघटनात्मक पातळीवर दोन उपमुख्यमंत्री होणार की तीन की एकही नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कोणत्याही चेहऱ्यावर निवडणूक लढवली नव्हती. निवडणुकीत मोदी भाजपचा चेहरा होते. नंतर योगींना मुख्यमंत्री बनवण्यात आले, तर सत्तेचा समतोल राखण्यासाठी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि केशव प्रसाद मौर्य यांना ओबीसी वर्गासाठी उपमुख्यमंत्री बनवण्यात आले. त्याचप्रमाणे ब्राह्मण वर्गानुसार दुसरे उपमुख्यमंत्री करण्यात आले होते.

यावेळी योगींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली गेली. अशा परिस्थितीत कोणालाही उपमुख्यमंत्री बनवले जाऊ शकत नाही, असेही बोलले जात आहे, कारण योगींनाही कोणत्याही दबावाशिवाय मुक्तपणे काम करायचे आहे, जेणेकरून देशात त्यांची वेगळी ओळख निर्माण होईल. मात्र, तरीही उपमुख्यमंत्रिपदासाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...