आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • UP Crime News And Updates: Brother Killed His Sister Over Small Dispute In Meerut

कुत्र्यासाठी नात्यांचा खून:बहिणीने कुत्र्यासाठी पोळी बनवण्यास नकार दिल्यामुळे भावाने मारली गोळी

मेरठ7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक गोळी डोक्यात आणि दुसरी छातीत मारली

कुत्र्याला पोळी बनवण्यास नकार दिल्यामुळे भावाने बहिणीवर गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली आहे. आरोपीने आपल्या सख्या बहिणीच्या डोक्यात आणि छातीत एक-एक गोळी मारली, यात तिचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरठच्या कैलाश वाटिका कॉलनीमध्ये आरोपी योगेंद्र कुमार त्याची आई सरोज, बहिण पारुल आणि लहान भाऊ आशीषसोबत राहतो. सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आशीषने पारुल (26)ला कुत्र्यांसाठी पोळी बनवण्यास सांगितली. तिने नकार दिल्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर रात्री 8:00 वाजता आशीषने रिवॉल्वरमधून बहिणीवर डोक्यात आणि छातीत एक-एक गोळ्या झाडल्या. यात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने आपला गुन्हा कबुल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...