आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Up Election 2022 | Marathi News |14 MLAs Including 3 Ministers Say Goodbye To BJP !! All The Three Ministers Joined BJP In 2017, Now To SP

यूपी विधानसभा:कोन नाय कोन्चा! 3 मंत्र्यांसह 14 आमदारांचा भाजपला रामराम!! तिन्ही मंत्री 2017 मध्ये बसपतून भाजपत आले, आता सपाकडे

लखनऊ / विजय उपाध्यायएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशात ऐन विधानसभेचे रण पेटले असताना भाजपला लागलेली गळती कायम आहे. सलग तिसऱ्या दिवशी योगी आदित्यनाथ सरकारला त्यांच्या मंत्र्यांनी झटका दिला. गुरुवारी आयुषमंत्री धर्मसिंह सैनी यांनीही मागास, दलित आणि वंचितांच्या उपेक्षेचा आरोप करत राज्यपालांकडे राजीनामा पाठवला.

मंगळवारी राजीनामा देणाऱ्यांत स्वामीप्रसाद मौर्य आणि बुधवारी सरकारमधून बाहेर पडणारे दारासिंह चौहान यांच्याप्रमाणे सैनी यांनीही समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेऊन आपले इरादे स्पष्ट केले आहेत. अतिमागास समुदायातील तिन्ही माजी मंत्री २०१७ विधानसभा निवडणुकीच्या आधी बसपमधून भाजपत आले होते. सैनींसोबत भाजपच्या मुकेश वर्मा, बालाप्रसाद अवस्थी व विनय शाक्य या आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

आजवर भाजपच्या १४ आमदारांनी पक्ष सोडला आहे. स्वामीप्रसाद यांनी १४ जानेवारीला मोठी राजकीय घोषणा करण्याचे सांगितले आहे. भाजपही मकरसंक्रांतीला तिकिटांच्या घोषणेसह डॅमेज कंट्रोलसाठी मोठे निर्णय घेऊ शकते.

1. स्वामीप्रसाद मौर्य
१९९१मध्ये जदकडून आमदार झाले. नंतर बसपत प्रवेश. पुन्हा २०१७ मध्ये भाजपत दाखल.
2. दारासिंह चौहान
दोन वेळा बसपकडून राज्यसभेवर.२०१५ मध्ये भाजप प्रवेश. २०१७ मध्ये आमदार.
3. धरमसिंह सैनी
३ वेळा बसपकडून तिकीट, आमदारकी.२०१७ मध्ये भाजपकडून आमदार व मंत्री.

पक्ष सोडणाऱ्यांत खासदारही... या वेळी ३-४ वेळा भाजपकडून खासदार-आमदार राहिलेले नेतेही पक्षातून बाहेर पडत आहेत. यात अवतारसिंह भडानांसारखे ४ वेळा खासदार राहिलेले नेते आहेत. पक्ष सोडणाऱ्यांतील ६ प्रथमच आमदार झालेले आहेत.

उमेदवार घोषित... काँग्रेसची यादी जाहीर, भाजपची लवकरच
काँग्रेस: १२५ उमेदवारांच्या यादीत ४०% महिला, २० मुस्लिम नावे; उन्नाव अत्याचार पीडितेच्या आईला तिकीट

काँग्रेसने यूपीच्या पहिल्या टप्प्याचे अर्ज भरण्याआधी १२५ उमेदवारांची यादी जाहीर केली. तीत उन्नाव अत्याचारातील पीडितेच्या आईसह अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांना तिकिटे देण्यात आली. ५० महिलांना तिकीट देण्यात आले आहे. सोनभद्रमध्ये उम्भा नरसंहारातील पीडित आदिवासी रामराज गोंड, आशा आंदोलनात सहभागी पूनम पांडेय तसेच सीएए आंदोलनादरम्यान तुरुंगवास भोगणारी सदफ जाफर यांनाही तिकिटे देण्यात आली. प्रियंका गांधींनुसार, ४०% महिला, २० मुस्लिमांना तिकिटे देण्यात आली. वाराणसीच्या पिंडरातून अजय राय यांना उमेदवारी देण्यात आली. राय यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदींविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवली होती.

सपा-रालोदची पहिली यादी... सपा-रालोदनेही २९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात ९ मुस्लिमांना तिकिटे देण्यात आली. ६ मागासवर्गीय, ५ जाट, ३-३ ब्राह्मण, ठाकूर, गुर्जर आणि १ सैनी जातीच्या उमेदवारास मैदानात उतरवण्यात आले आहे.

भाजप : १७२ जागांवर सहमती, लवकरच यादी
दिल्लीत दोन दिवस चाललेल्या बैठकीनंतर गुरुवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. तीत उमेदवार निवडीवरून एकूण १७२ जागांवर सहमती झाल्याचे वृत्त आहे.

पंजाब : फोन पोलद्वारे ‘आप’ ठरवणार सीएमचा चेहरा
आम आदमी पार्टी पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा फोन पोलद्वारे जनतेचे मत घेऊन निश्चित करेल. पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले की, या निवडणुकीत मी सीएमचा चेहरा असणार नाही.