आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • UP Election 2022 । BJP Will Get More Than 300 Seats In Uttar Pradesh Assembly Elections, Claims Home Minister Amit Shah

भाजपचे मिशन यूपी इलेक्शन:उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला 300 पेक्षा जास्त जागा मिळतील, गृहमंत्री अमित शहा यांचा दावा

लखनऊ16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली तयारी सुरू केली आहे. यापार्श्वभुमीवर गृहमंत्री अमित शहा आज आझमगढच्या दौऱ्यावर आहे. ते आज भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत निवडणुकीसंदर्भात भेट घेणार आहे. पूर्वांचलमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात जोर लावले आहे. याआधी अमित शहा वाराणसी दौऱ्यावर होते.

तेथे देखील त्यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि निवडणूक प्रभारी उपस्थित होते. त्यावेळी अमित शहा म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत मिळणारे यश हे 2024 साठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बैठकीनंतर भाजपचे प्रभारी स्वतंत्र देव सिंह म्हणाले की, अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना विधानसभेत 300 पेक्षा अधिक जागा जिंकूण आणण्याचे टार्गेट दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभारी स्वतंत्र देव सिंह म्हणाले की, बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यात अमित शहा यांनी 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत 300 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष असून, त्यासंबधीची रणनीती तयार करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात भीती आणि भ्रष्टाचारमुक्त शासन आणले आहे. शाह म्हणाले की, 2022 मध्ये होणारी निवडणूक ही कार्यकर्त्यांना जीवावर होणार आहे. त्यांना यूपीचे जनता आशिर्वाद देईल.

अखिलेशने साधला निशाणा
गृहमंत्री अमित शहांच्या या दौऱ्यावर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, "यूपीमध्ये भाजपचा पराभव होणार आहे. त्याची भीता असल्याने पक्षात गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे कोणीना कोणी भाजपचा नेता उत्तर प्रदेशचा दौरा करत आहे. लखीमपुरमध्ये घडलेल्या घटनेनंतर जनता भाजपला धडा शिकवेल." असे म्हणत अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला.

बातम्या आणखी आहेत...