आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Up Election 2022 | Marathi News | Up Election | Silver Of Mobile Companies; Demand For This Specialty Has Grown Significantly As A Result Of Recent Corporate Scandals

निवडणूक:मोबाइल कंपन्यांची चांदी; यूपीत आभासी प्रचारामुळे इंटरनेट डेटाची मागणी 40 टक्के वाढली

विजय उपाध्याय | लखनौ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोज ६३,८६७ टीबी डेटाचा वापर, ७३ लाख नवे कनेक्शन

कोरोनामुळे पाच राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात निर्बंध सुरू आहेत. त्यामुळे अभासी विश्वात प्रचार शिगेला आहे. या पार्श्वभूमीवर मात्र मोबाइल आणि इंटरनेट पुरवणाऱ्या कंपन्यांची चांगलीच चांदी झाली आहे. ४०३ जागा असलेल्या उत्तर प्रदेशात इंटरनेट डेटाचा वापर विक्रमी होत आहे. यूपीत रोज सुमारे ६३,८६७ टेरा बाईट (टीबी) इंटरनेटचा वापर होत असून प्रदेशात सुमारे १८ कोटी मोबाइल जोडण्या आहेत.

यातील सुमारे २ कोटी बीएसएनएलशिवाय तिन्ही खासगी कंपन्यांच्या डेटाचा वापर एक महिन्यात सुमारे ४० टक्के वाढला असून ८ जानेवारीला निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर हा परिणाम झाला आहे. मोबाइल कंपन्यांनी गेल्या एक महिन्यात सुमारे ७३ लाख नव्या जोडण्याही दिल्या आहेत.

बीएसएनएलने १२.१० लाख नवे ग्राहक जोडले आहेत. तर तीन खासगी कंपन्यांनी क्रमश: २६.६५ लाख, १९.२० लाख आणि १५.१७ लाख ग्राहक जोडले. बीएसएनएलचा रोज सरासरी डेटा वापर ८ जानेवारीनंतर १७६ टीबी झाला. यापूर्वी तो सरासरी ११२ टीबी होता. तर, ३जी-४जी सेवा देणाऱ्या तीन खासगी कंपन्यांचा रोजचा डेटा ३३००० टीबीवरून ३५,५०० टीबी, २२००० वरून २८००० टीबी झाला असून तिसऱ्या अशाच खासगी कंपनीच्या डेटाचा खप याच प्रमाणात वाढला असल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...