आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • UP Election 2022 | Marathi News | Up Election Update | ADR Report 37% Candidate Billionaire; 27% Are Rebels; Crimes Filed Against 167 Out Of 591 Seats, 621 Candidates

यूपीत चौथा टप्पा:एडीआर रिपोर्ट- 37% उमेदवार कोट्यधीश; 27% आहेत बंडखोर; 59 जागा, 621 उमेदवारांत 167 जणांवर गुन्हे दाखल

लखनऊ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सपाच्या सर्वाधिक 39%, काँग्रेसच्या 38%, बसपच्या 37%, भाजपच्या 20% उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल

उत्तर प्रदेश विधानसभेच्या चाैथ्या टप्प्यातील ५९ जागांसाठी लवकरच मतदान हाेणार आहे. या ठिकाणी ६२४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यादरम्यान या ठिकाणी असलेल्या ५९ जागांवर सर्वांची नजर लागलेली आहे. कारण, यातील २९ टक्के मतदारसंघ हे अधिकच संवेदनशील मानले जातात. या मतदारसंघात आमदारकीसाठी उत्सुक असलेल्या ६२४ मध्ये १६७ म्हणजेच ३७ टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. यातील २३१ उमेदवार हे थेट काेट्यधीश आहेत.

याच काेट्यधीश असलेल्या २७ टक्के उमेदवारांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर बंडखाेरी केली आहे, अशा प्रकारचा धक्कादायक अहवाल उप्र इलेक्शन वॉच व असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) संस्थेने सादर केला. यामधील माहिती सर्वांना आश्चर्यचकित करणारी आहे.

तसेच महिलांवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हे दाखल (कलम ३७६) असलेले ९ उमेदवार हे निवडणूक लढवत आहेत. तसेच पाच उमेदवारांवर थेट हत्या करण्याचा गंभीर गुन्हा दाखल झालेला आहे.

शिक्षण...६०% उमेदवार आहेत उच्चशिक्षित
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या चाैथ्या टप्प्यामध्ये २०१ म्हणजेच ३२ टक्के उमेदवारांचे इयत्ता ५ ते १२ वीपर्यंत शिक्षण झाले आहेत. तसेच ३७४ म्हणजेच ६० टक्के उमेदवार हे उच्चशिक्षित आहेत. याशिवाय यामधील ३० उमेदवारांनी साक्षर व ९ जणांनी निरक्षर असल्याचे सांगितले. यातील दाेन उमेदवारांनी याबाबतची माहितीच दिली नाही.

पक्ष उमेदवार काेट्यधीश
भाजप 57 50 (88%)
सपा 57 48 (84%)
बसप 59 44 (75%)
काँग्रेस 58 28 (48%)
‘आप’ 45 16 (36%)

पक्ष उमेदवार गुन्हे दाखल असलेले गंभीर गुन्हे दाखल
सपा 57 30 (53%) 22 (39%)
काँग्रेस 58 31 (53%) 22 (38%)
बसप 59 26 (53%) 22 (37%)
भाजप 57 23 (40%) 17 (30%)
‘आप’ 45 11 (24%) 9 (20%)

बातम्या आणखी आहेत...