आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • UP Election 2022 Vs Mayawati; Reasons Why Bahujan Samaj Party (BSP) President Silent

4 वेळच्या CM मायावतींचे यावेळी मौन का:दोन कारणांमुळे भाजपवर निशाणा साधू शकत नाहीयेत मायावती, गेल्या 15 वर्षांपासून जिंकू शकल्या नाहीत कोणतीही मोठी निवडणूक

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

देशातील सर्वात मोठे राज्य यूपीमध्ये निवडणुका सुरू आहेत, मात्र मायावतींनी मौन धारण केलेय. निवडणुकीच्या आठ दिवस आधी बुधवारी त्यांनी आग्रा येथे पहिली सभा घेतली. चार वेळा यूपीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या याच मायावती आहेत. त्या तीन दशकांहून अधिक काळ यूपीच्या राजकारणात एक मोठा चेहरा राहिल्या आहेत आणि स्वत:ला दलित आणि मागासवर्गीयांची सर्वात मोठ्या नेता मानतात.

आता परिस्थिती अशी आहे की, गेल्या 15 वर्षांपासून कोणीही मोठी निवडणूक जिंकू शकलेले नाही. अखेर या ताई गप्प का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी, आम्ही मायावतींच्या एकेकाळी जवळच्या अधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी नाव न सांगण्याच्या विनंतीवर मायावतींच्या मौनाची दोन कारणे दिली.

पहिले कारण उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती हे आहे. नीकटवर्तीयांनुसार मायावती आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्धच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणामुळे त्या केंद्राच्या तावडीत सापडल्या आहेत, त्यामुळे त्या उघडपणे भाजपवर निशाणा साधू शकत नाहीयेत.

दुसरे कारण म्हणजे, त्यांचे आरोग्य. मायावती या 66 वर्षांच्या झाल्या आहेत. कोरोनामुळे देखील त्यांना आपले पाऊल मागे घ्यावे लागले.

मायावती गप्प आहेत हे या दोन गोष्टींवरूनच दिसून येत नाही, तर अशा अनेक घटना आहेत, ज्यावरून मायावती भाजपविरोधात उघडपणे बोलत नाहीत हे सिद्ध होते. आम्ही तुमच्यासोबत अशा 4 घटना शेअर करत आहोत, ज्यावरून हे सिद्ध होते की मायावती केवळ बोलण्याची औपचारिकता करत आहेत.

मायावती किती वेळा गप्प राहिल्या आणि त्याच घटनांवर इतर विरोधी पक्षांच्या प्रतिक्रिया काय होत्या, हे जाणून घ्या.

6 जानेवारी 2022 पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी
पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींवरून मायावतींनी सोशल मीडियावर वक्तव्य शेअर करून औपचारिकता सुरू केली. त्यांनी लिहिले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेतील त्रुटी अत्यंत चिंताजनक आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन त्याची उच्चस्तरीय निःपक्षपाती चौकशी करून दोषींना योग्य ती शिक्षा व्हावी आणि अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी हे आवश्यक आहे.

काय होती काँग्रेसची प्रतिक्रिया : काँग्रेसने याप्रकरणी थेट पंतप्रधानांना घेरण्याचा प्रयत्न केला. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, भाजप आणि पंतप्रधानांनी त्यांच्या 'शेतकरी विरोधी भूमिकेचे' आत्मपरीक्षण करावे. रस्ता वापरणे हा पंतप्रधानांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमाचा भाग नव्हता, स्वत: मोदींनी रस्त्याने जाण्याचा अचानक निर्णय घेतला. पंजाबमध्ये खुर्च्या रिकाम्या होत्या, लोक पोहोचले नाहीत. त्यामुळे भाजपच्या गोटातून आता हे कारण दिले जात आहे.

20 नोव्हेंबर 2021, वादग्रस्त कृषी कायदे मागे घेणे
देशात तीव्र आंदोलनानंतर तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्यात आले. केंद्र सरकारच्या या घोषणेचे 'देर आए दुरुस्त आऐ' म्हणत स्वागत केले, मात्र हा निवडणूक स्वार्थाचा आणि मजबुरीचा निर्णय असल्याचे सांगत भाजपच्या हेतूवरही शंका उपस्थित केली. किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन कायदा करावा आणि आंदोलक शेतकऱ्यांवर दाखल केलेले सर्व खटले मागे घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

काय होती काँग्रेसची प्रतिक्रिया : सुरजेवाला म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला शेतकरी संघर्ष कामी आला आहे. आता भाजपचा पराभव हा देशाचा विजय आहे. त्यांना मोदी सरकारकडून फक्त अत्याचारच मिळाले. मोदी सरकारने शेतकऱ्यांवर लाठीमार केला, दिल्लीच्या सीमा खोदल्या आणि शेतकऱ्यांची डोके फोडण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांना दहशतवादी, नक्षलवादी, आंदोलक म्हटले गेले.

22 जून 2021, कोरोना व्हॅक्सीन प्रकरण
देशात कोरोना लसीच्या निर्मितीसोबतच लसीकरणासंदर्भातील वाद, राजकारण, आरोप-प्रत्यारोप आदींवर त्यांनी केंद्र सरकारला सल्ल्याच्या स्वरूपात निवेदन दिले. ते म्हणाले की, सर्व पक्षांसह सत्तेत असलेल्या भाजपच्या केंद्र व राज्य सरकारने लसीचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत.

काँग्रेसची प्रतिक्रिया काय होती: काँग्रेस सुप्रीमो सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसीकरण आणि चाचणीबाबत अनेक पत्रे लिहिली आणि काँग्रेस शासित राज्यांमध्ये पक्षाच्या नेत्यांनाही सक्रिय ठेवले.

22 जून 2020, चीनसोबत वाद
15 जून 2020 रोजी लडाखमध्ये चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत एका कर्नलसह 20 लष्करी जवान शहीद झाल्याबद्दल मायावती म्हणाल्या की या घटनेमुळे संपूर्ण देश दु:खी, चिंतेत आणि संतप्त आहे. सरकार आणि विरोधी पक्ष दोघांनीही पूर्ण परिपक्वता आणि एकजुटीने काम करणे आवश्यक आहे जेणेकरून सरकारचे पाऊल देशात आणि जगात प्रभावी ठरेल.

त्या म्हणाल्या की, अशा कठीण आणि आव्हानात्मक काळात लोक आणि तज्ञांचे मत भिन्न असू शकते, परंतु मुळात देशाचे हित आणि सीमेचे रक्षण करणे हे सरकारवर सोडणे चांगले आहे, ही जबाबदारी देखील सरकारची आहे. .

काय होती काँग्रेसची प्रतिक्रिया : सुरजेवाला यांनी चीन वादावर केंद्राला प्रश्न विचारला. केंद्र सरकार गप्प का? चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या लष्करी अधिकारी आणि जवानांबद्दल देश दु:खी आहे, मात्र पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी मौन बाळगले आहे.

सोशल इंजिनीअरिंग फेल, मतांची टक्केवारीही घसरली
2007 पासून यूपीमध्ये बसपाने कोणतीही मोठी निवडणूक जिंकलेली नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, पक्षाने सपासोबत युती करून 10 जागा जिंकल्या, परंतु लवकरच पक्षाने सपासोबत काडीमोड केला.

तेव्हापासून मायावतींच्या मनोवृत्तीत बदल झाला. भाजपच्या राज्य आणि केंद्र सरकारवर थेट निशाणा साधण्याचे त्यांनी टाळायला सुरुवात केली.

त्यांनी कधी भाजपवर निशाणा साधला असला तरी त्यांनी काँग्रेस आणि सपाला त्याच वेळी निशाण्यावर घेतले. असे अनेक प्रसंग आले जेव्हा मायावती भाजपप्रती मवाळ दिसल्या.

कोअर वोटर यांनाही येत राहिली कांशीराम यांची आठवण

 • उत्तर प्रदेशात दलितांच्या 64 जाती आहेत. कांशीराम यांच्या वेळी बसपा सर्व दलित जातींचे राजकारण करत होत्या.
 • तेव्हा बसपाचे तिकीट ही विजयाची हमी मानली जात होती, मात्र मायावतींनी सत्ता हाती घेतल्यानंतर केवळ जाटव समाजालाच महत्त्व दिले गेले. आता बसपा जाटवांच्या जोरावरच निवडणुकीच्या रिंगणात उतरते.
 • दलितांपैकी जाटव जातीची लोकसंख्या 18 टक्के आहे. अशा स्थितीत ज्यांची सामाजिक पकड मजबूत आहे, अशा उमेदवारांवरच रिंगणात उतरवते.
 • त्याचवेळी याचा फायदा घेत भाजपने गैर-जाटव आणि गैर यादवचा नारा बुलंद केला आणि इतर दलित जातींची बाजू घेतली.

कुणालाही बहुमत मिळाले नाही तर मायावती काय करणार?

 • आतापर्यंत आलेल्या सर्व सर्वेक्षणांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून दाखवण्यात येत आहे, तर सपा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 • अशा स्थितीत निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही, तर मायावती कोणाची बाजू घेणार, हा मोठा प्रश्न आहे. एकप्रकारे मतमोजणी म्हणजेच 10 मार्चनंतर मायावतींची खरी परीक्षा सुरू होईल.
 • मायावती आणि भाजपचे जुने राजकीय नाते आहे. मायावती चार वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. जून 1995 मध्ये गेस्ट हाऊसच्या घटनेनंतर मायावती भाजपच्या पाठिंब्याने पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या होत्या. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ फक्त 4 महिन्यांचा होता.
 • 1997 मध्येही भाजपच्या पाठिंब्याने त्या दुसऱ्या मुख्यमंत्री बनल्या. 2002 मध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनल्या. 2007 मध्ये प्रथमच उत्तर प्रदेशमध्ये पूर्ण बहुमताने बसपाचे सरकार स्थापन झाले आणि मायावती चौथ्यांदा मुख्यमंत्री झाल्या.

मायावतींच्या मौनावरही प्रियंकांनी उपस्थित केले प्रश्न

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही मायावतींच्या मौनावर प्रश्न उपस्थित केला आहे, त्यावर मायावतींनीही प्रत्युत्तर दिले. 21 जानेवारी रोजी प्रियंका म्हणाल्या, 'राज्यातील निवडणुकीच्या काळातही बसपा शांत आहे. बसपा प्रमुख मायावती निवडणुकीत त्यांच्या नेहमीच्या शैलीत प्रचार करत नसून मौन बाळगून आहेत.'

त्या म्हणाल्या, 'सहा-सात महिन्यांपूर्वी आम्हाला वाटायचे की त्यांचा पक्ष सक्रिय नाही, कदाचित ते निवडणुका जवळ आल्यावर सुरुहोतील, पण आता आम्हीही हैराण आहोत कारण निवडणुका सुरु झाल्या आहेत. तरीही ते सक्रिय नाहीत. भाजप सरकार त्यांच्यावर दबाव आणत असल्याची शक्यता आहे.'

23 जानेवारी 2022 रोजी मायावतींचा प्रियांका यांच्यावर पलटवार
बसपा सुप्रीमो मायावती यांनी प्रियांका गांधी यांच्यावर एका दिवसानंतर पलटवार केला. 'काँग्रेस हा मतं कापणारा पक्ष आहे, लोकांनी त्यांची मतं खराब करू नयेत. यूपी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाची अवस्था इतकी वाईट राहिली आहे की त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराने काही तासांतच आपली भूमिका बदलली आहे. अशा परिस्थितीत लोकांनी काँग्रेसला मत देऊन आपले मत खराब न करता बसपाला एकतर्फी मत दिलेले बरे होईल.'

बातम्या आणखी आहेत...