आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपी विधानसभा निवडणूक:काँग्रेस आघाडी करणार नाही, स्वबळावर लढणार : प्रियंका गांधी

लखनऊ13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी वढेरा यांनी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीतील सर्व ४०३ जागा स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. बुलंदशहरमध्ये काँग्रेस प्रतिज्ञा-लक्ष्य मेळावा २०२२ ला संबोधित करत होत्या. त्यांनी सांगितले की, काँग्रेसला राज्यात पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पक्षाच्या अनेक लोकांनी मला सांगितले की, काहीही करा, मात्र या वेळी आघाडी करू नका. मी तुम्हास आश्वासन देते की, आम्ही सर्व जागा स्वबळावर लढू. याचा आराखडाही तयार आहे. प्रतिज्ञा मेळाव्यात प.उत्तर प्रदेशच्या १४ जिल्ह्यांतील काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी होते.

प्रियंका म्हणाल्या, उत्तर प्रदेशात भाजपविरुद्ध केवळ काँग्रेस प्रत्येक ठिकाणी उभी आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष सप व बसपने भाजपसमोर गुडघे टेकले आहेत. सध्या दीड वर्षात आमचे शेकडो कार्यकर्ते तुरुंगात आहेत. भाजपशी आम्हीच लढत आहोत. निवडणुकीत ४०% महिलांना तिकीट दिले जाईल.

पूर्वांचल एक्स्प्रेस वेचे उद्‌घाटन, सपाला विजय यात्रेला परवानगी नाही
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या १६ नोव्हेंबरपासून पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर गाझीपूर ते आझमगडपर्यंतच्या विजय यात्रेस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. गाझीपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दिवशी सुलतानपूरमध्ये पूर्वांचल एक्स्प्रेस-वेचे उद्घाटनाचे कारण देत परवानगी नाकारली आहे. उद्‌घाटन एक्स्प्रेस वेच्या सुलतानपूरच्या जयसिंहपूरमध्ये होईल. तिथे इंडियन एअरफोर्सचे रफाल, हर्क्युलिससह अनेक लढाऊ विमानांचे टच अँड गो लँडिंग केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...