आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Up Election | Uttar Pradesh State Assembly Election 2022 | Marathi News | 63% Turnout For 55 Seats In The Second Phase In UP; 72% Turnout In More Than 55% Muslim majority Constituencies

भास्कर अ‍ॅनालिसिस:यूपीत दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी 63% मतदान; 55% पेक्षा अधिक मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्ये 72% मतदान

लखनऊ6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

उत्तर प्रदेश विधानसभेच्या ५५ जागांसाठी साेमवारी दुसऱ्या टप्प्यात माेठ्या उत्साहात मतदान झाले. यादरम्यान ९ जिल्ह्यांमध्ये ५५ जागांसाठी जवळपास ६३ टक्के मतदान झाल्याची नाेंद आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीमध्ये या मतदानाच्या आकडेवारीत जवळपास ३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. गत २०१७ मधील निवडणुकीत या ५५ जागांसाठी ६६ टक्के मतदान झाले हाेते. यंदा ही टक्केवारी घसरली आहे. आता झालेल्या मतदानातून जवळपास ५८६ उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले आहे. याठिकाणी २.०२ काेटी मतदारांची नोंद आहे. यातील ६३ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे

यामधील सहारनपूर जिल्ह्यात सर्वाधिक ६७.०५ टक्के मतदान झाल्याची नाेंद आहे. मतदारांनी सकाळपासून मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी बूथवर रांगा लावल्या हाेत्या. त्यांच्यात उत्साहाचे वातावरण हाेते.

ईव्हिएममध्ये बिघाडची तक्रार : दुसऱ्या टप्प्याच्या मतदानादरम्यानही काही बूथवर ईव्हिएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या हाेत्या. मात्र, तत्काळ निवडणूक आयाेगाच्या कर्मचाऱ्यांनी अडचणी दूर केल्या.

 • २०१७ पेक्षा ३ % कमी; ०.३ % वाढल्याने भाजपला ३३ जागांवर झाला हाेता फायदा
 • यूपीच्या दुसऱ्या टप्प्यात ६३ % मतदान झाले. २०१७ ची आकडेवारी ६६% हाेती. म्हणजे आता मतदानात ३ टक्के अशी घसरण झाली आहे.
 • २०१२ मध्ये ५५ मतदारसंघांत ६५.१७ टक्के मतदान झाले हाेते. २०१७ मध्ये जवळपास ०.३६% मतदानात वाढ झाली हाेती.
 • २०१२ मध्ये सपाने या ५५ जागांपैकी ४० ठिकाणी मताधिक्यांनी आपले उमेदवार निवडून आणले हाेते.
 • २०१७ मध्ये भाजपला ३७ जागांवर विजय संपादन करता आला. ३३ जागांचा भाजपला फायदा झाला.
 • २०१२ मध्ये ५५ जागांपैकी फक्त ४ जागांवर भाजप उमेदवारांचा विजय निश्चित केला.
 • सपाला २०१७ मध्ये याच ठिकाणी २४ जागांच्या नुकसानीला सामाेरे जावे लागले हाेते.
 • बसपचा ८ व काँग्रेसचा एका जागेवर पराभव झाला हाेता.
बातम्या आणखी आहेत...