आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हाथरस प्रकरणावर योगींची प्रतिक्रिया:'बलात्कार करणाऱ्यांचा सत्यानाश अटळ आहे, त्यांना अशी शिक्षा देण्यात येईल की...', उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगींची हाथरस प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हाथरस येथे 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि निर्घृण हत्या प्रकरणाचा संपूर्ण देशात निषेध केला जात आहे. तरुणींचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळेली पाहायला मिळत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यावर अखेर भाष्य केले आहे.

उत्तर प्रदेशातील माता-भगिनीच्या सन्मान आणि स्वाभिमानाला ठेच पोहोचवण्याचा विचार सुद्धा करणाऱ्यांचा सत्यानाश होईल असे म्हणत योगी आदित्यनाथ यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच यांना असा दंड मिळेल जो भविष्यात एक उदाहरण म्हणून सादर केले जाईल. तुमचे उत्तर प्रदेश सरकारमधील प्रत्येक माता-भगिनीची सुरक्षा आणि विकासाविषयी संकल्पबद्ध आहे. असे ट्विट करत योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाज सार्वजनिकपणे या प्रकरणावर भाष्य केले आहे.

हाथरस येथे 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. हा प्रकार उघडकीस आला आणि राज्यातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. या प्रकरणामधील पीडित तरुणीच्या नातेवाईकांना तिच्यावर अंत्यसंस्कारही करुन न दिल्याने देशभरामध्ये या प्रकरणावरुन योगी सरकारवर टीका केली जात आहे. योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही मोठ्या प्रमाणात केली जात आहे.