आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालग्नात मुलीला दुचाकी किंवा कार देण्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण उत्तरप्रदेशातील हमीरपूरमध्ये एका वधूपित्याने आपल्या मुलीला लग्नात चक्क जेसीबी भेट दिला आहे. नवरीचे वडिल सेवानिवृत्त आर्मीमॅन आहेत.
याप्रसंगी नवरी नेहाचे वडील म्हणाले की, मुलीला कार भेट दिली असती तर ती घरासमोरच उभी ठेवावी लागली असती. पण जेसीबी भेट दिल्याने त्यांच्या उत्पन्नाला हातभार लागणार आहे. तर मुलीला देखील कोणाकडे पैसे मागण्याची वेळ येणार नाही. यातून 2 ते 3 जणांना रोजगार देखील मिळणार आहे. या जेसीबीची किमंत सुमारे 30 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
नवरदेव वायूसेनेत कार्यरत
ही घटना सुमेरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देव गावातील आहे. येथील विकास उर्फ योगेंद्र हा हवाई दलात कार्यरत आहे. त्याचे वडील स्वामीदिन चक्रवर्ती यांनी योगेंद्रचे लग्न नेहाशी ठरविले होते. माजी सैनिक परसराम प्रजापती यांची नेहा मुलगी आहे. नेहा स्पर्धा परीक्षेची तयारी करित आहे.
15 डिसेंबरला लग्नसोहळा पार पडला
15 डिसेंबर रोजी शिव लॉन गार्डन गेस्ट हाऊसमध्ये नेहा-योगेंद्रचे लग्न थाटामाटात पार पडले. मुलीला निरोप देताना वडिलांनी तिला भेट म्हणून चक्क जेसीबी भेट दिला. तेव्हा सर्व पाहुणे मंडळी चकित झाले. नवरदेवाचे वडील स्वामीदीन म्हणाले, 'मुलीच्या वडिलांनी जेसीबी देण्याचे सांगितले होते. आम्हीही त्याच्याशी सहमत झालो. भेटीतील बुलडोझर पाहून पाहुणेमंडळी देखील आश्चर्यचकित झाले. अनेकांनी त्याच्यासोबत सेल्फी काढायला सुरुवात केली.
नवरी नेहाने सांगितले की, जेसीबी भेट देण्यामागे वडिलांचे म्हणणे आहे की, भेट म्हणून कार दिली असती तर ती केवळ घरासमोर उभी ठेवावी लागली असती. मात्र, जेसीबी हे उत्पन्नाचे साधन आहे. मी सिव्हिल सर्विसची तयारी करत आहे. मलाही माझ्या पतीकडून पैसे मागावे लागणार नाहीत. त्यासाठी ही भेट मला वडिलांनी दिली आहे.
नवरदेव म्हणाला - म्हणून भेट स्विकारली..!
नवरदेव योगेद्र म्हणाला की, माझे सासरे शिपाई राहीलेले आहेत. एक सैनिक किती दिवस घरी राहू शकतो? यांची त्यांना पुर्ण जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी कारऐवजी जेसीबी देणे योग्य मानले. यातून दोन जणांना रोजगारही मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे. जर मी कार घेतली असती तर मला ती चालवायला वेळ कुठे मिळाला असता? त्यामुळे त्यांनी दिलेली भेट मी देखील स्विकारली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.