आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • UP: Hathras Gangrape Case Update: Gang Rape Victim Passes Away In Delhi Safdarjung Hospital

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाथरसची निर्भया:राक्षसांनाही लाज वाटेल असे क्रौर्य; नराधमांनी गँगरेप करून पीडितेच्या पाठीचा मणका तोडला, जीभही छाटली... अखेर श्वास थांबला

नवी दिल्ली/हाथरस (पूनम कौशल)7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वडील म्हणाले- गावातील ज्या गुंडांनी माझ्या मुलीवर बलात्कार केला, त्यांनी माझ्या वडिलांचीही बोटे कापली होती,
  • भावाने सांगितली पूर्ण कहाणी...काय झाले होते त्या दिवशी

आणखी एक निर्भया... यूपीच्या हाथरस जिल्ह्यात चार नराधमांनी राक्षसांनाही लाजवेल असे क्रौर्य दाखवले. घटना १४ सप्टेंबरची आहे. नराधमांनी आधी पीडितेवर सामूहिक अत्याचार केला. मग तिच्या पाठीचा मणका मोडला. इतक्यावर ते थांबले नाहीत. पीडितेची जीभही छाटली. तिच्याच ओढणीने तिचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. ती मृत झाल्याचे समजून तिला शेतात सोडून पळून गेले. पीडितेच्या गळ्यात तीन फ्रॅक्चर झाले. १५ दिवसांपर्यंत ती इशाऱ्यांत आपल्या असह्य वेदना मांडत होती. ...अन् अखेरीस मंगळवारी पहाटे तिने शेवटचा श्वास घेतला. २२ सप्टेंबरला रुग्णालयात जबाब नोंदवताना कसेबसे तिने आपबीती सांगितली. त्याचा उल्लेख अहवालातही आहे. चारही नराधमांच्या मुसक्या बांधण्यात आल्या आहेत. संदीप, रामू, लवकुश व रवी ही त्यांची नावे आहेत.

बलात्कार पीडित मुलीला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले होते.
बलात्कार पीडित मुलीला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले होते.

समाज असा कसा...वडील म्हणाले- गावातील ज्या गुंडांनी माझ्या मुलीवर बलात्कार केला, त्यांनी माझ्या वडिलांचीही बोटे कापली होती, अन्याय कुठपर्यंत सहन करायचा?

‘भास्कर’ने पीडितेच्या पित्याशी संवाद साधला तेव्हा मुलीचे नाव घेताच त्यांना रडू कोसळले...चेहरा मास्कने झाकलेला होता, डोळ्यांत वेदना आणि भीती होती, ते म्हणाले,‘हे लोक गावातील गुंड आहेत. माझ्या मुलीवर बलात्कार करण्याआधी त्यांनी माझ्या वडिलांनाही मारहाण केली होती. त्यांची बोटेही कापली होती. ते आम्हाला धमकावत होते, आम्ही सहन करत होतो आणि जाऊ द्या, असे म्हणत होतो. आता त्यांनी मुलीवर अत्याचार केला आहे. त्यांना फाशीची शिक्षाच व्हावी.’

दवाखान्याबाहेर हताश होऊन बसलेले पीडितेचे कुटुंब
दवाखान्याबाहेर हताश होऊन बसलेले पीडितेचे कुटुंब

भावाने सांगितली पूर्ण कहाणी...काय झाले होते त्या दिवशी

१४ सप्टेंबरला सकाळी पीडिता, माझा मोठा भाऊ आणि आई गावातील जंगलात गवत कापण्यासाठी गेले होते. गवताचा एक भारा बांधला गेल्यानंतर मोठा भाऊ तो घेऊन घरी आला. आई आणि बहीण शेतात होत्या. आई पुढे गवत कापत होती. बहीण थोडी मागे राहून गवत गोळा करत होती. तेव्हाच चारही गुंडांनी तिच्या गळ्यातील ओढणी खेचत शेतात नेले आणि सामूहिक अत्याचार केला. आईने मुलीला हाका मारल्या तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही. आधी तिची चप्पल दिसली, नंतर बाजरीची तुटलेली ताटं दिसली तेव्हा ती शेतात गेला. तेथे बहीण अत्यंत वाईट अवस्थेत बेशुद्धावस्थेत होती. आईने आरडाओरड केली तेव्हा काही मुले पॉलिथीनमध्ये पाणी घेऊन आली. पाणी तिच्या तोंडावर शिंपडले, पण तिला शुद्ध आली नाही. नंतर तिला रुग्णालयात नेले.

बातम्या आणखी आहेत...