आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालखनऊमधील PUBG हत्याकांडात आईची हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलाने कबुली दिली की, त्याने रात्री 2 वाजता आईवर गोळी झाडली, मात्र दुपारी 12 वाजेपर्यंत ती जिवंत होती, तडफडत होती. मरणाची वाट पाहत तो पुन्हा पुन्हा दरवाजा उघडायचा आणि आईला तडफडताना पाहायचा. त्यानंतर खोली पुन्हा बंद करायचा.
अतिरिक्त पोलिस उपायुक्त (ADCP), काशिम अब्दी यांनी सांगितले की, साधना सिंग यांची हत्या करणाऱ्या त्यांच्या 16 वर्षीय मुलाची पुन्हा चौकशी करण्यात आली. त्यात त्याने सांगितले की, शनिवार, 4 जून रोजी रात्री तो आईसोबत झोपला होता. पिस्तूल त्याच खोलीच्या कपाटात ठेवले होते. आईच्या उशाखालची चावी काढून दोन वाजण्याच्या सुमारास त्याने कपाटातून पिस्तूल काढले. पिस्तुलासोबतच मॅगझिन आणि गोळ्याही ठेवण्यात आल्या होत्या. मॅगझिन लोड करताना त्याचे हात थरथरत होते, कारण त्याने यापूर्वी कधीही खरी बंदूक चालवली नव्हती.
बहीण ज्या बाजूला झोपली होती त्याच बाजूने गोळी झाडली
हातांचा थरकाप झाल्याने तीन गोळ्या जमिनीवर पडल्या. यानंतर तो पिस्तूल घेऊन आईकडे गेला. 10 वर्षांची बहीणही आईसोबत बेडच्या उजव्या बाजूला झोपली होती. पिस्तुलातून गोळी निघून जाईल आणि पलीकडे झोपलेल्या बहिणीला गोळी लागू शकते, अशी शक्यता त्याला वाटली. त्यामुळे बहीण ज्या बाजूला झोपली होती त्याच बाजूने जाऊन त्याने गोळी झाडली.
बहीण उठल्यावर तिचा चेहरा आपल्याकडे वळवला
त्याने पिस्तूल आईच्या कानशिलाच्या उजव्या बाजूला लावले आणि डोळे बंद करून ट्रिगर दाबला. गोळीचा आवाज ऐकून बहीण घाबरून उठली, पण मुलाने तिचे तोंड पकडून आपल्या दिशेने वळवले. गोळी झाडताच आईच्या डोक्यातून रक्ताची धार वाहू लागली. यानंतर तो बहिणीसोबत दुसऱ्या खोलीत गेला आणि या खोलीचा दरवाजा बंद केला.
10 तासांत 8 वेळा आईला तडफडताना पाहिले, दुपारी 12 वाजता श्वास थांबला
खून करणाऱ्या मुलाने पोलिसांना सांगितले की, गोळी झाडल्यानंतर आई बेडवर पडून तडफडू लागली. तिला त्या अवस्थेत सोडून तो बहिणीला घेऊन दुसऱ्या खोलीत गेला. दुसरी गोळी झाडण्याची इच्छा झाली नाही. त्यामुळे तो आपल्या आईच्या मृत्यूची वाट पाहू लागला. तो दर तासाला खोलीत जाऊन आईला वेदनांनी विव्हळताना पाहायचा, पण तिचा जीव वाचवावा असे एकदाही त्याला वाटले नाही.
प्रत्येक वेळी जवळ जाऊन नाकावर हात ठेवून श्वास थांबलाय की नाही हे पाहत असे. 10 तासांत 8 वेळा त्याने श्वास तपासला. दुपारी 12 वाजता तो शेवटच्या वेळी गेला तेव्हा आईच्या अंगाची काहीच हालचाल होत नव्हती. श्वास थांबला होता. तेव्हा मुलाला खात्री पटली की आई आता मेली आहे.
घराजवळच होते मोठे रुग्णालय होते, वाचू शकला असता जीव
एडीसीपी सांगतात की, साधना यांच्या घरापासून पीजीआय हॉस्पिटलचे अंतर 2 किमी असेल. गोळी डोक्यातून गेली होती. त्यांना वेळीच उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता. एडीसीपी सांगतात की, जेव्हा आरोपी मुलाने ही माहिती दिली तेव्हा रागासोबतच खेदही वाटला, कदाचित कोणीतरी पोलिसांना माहिती दिली असतील.
3 दिवस घरात लपवून ठेवला मृतदेह
वडील म्हणाले - माझ्या मुलाने आयुष्यभर तुरुंगात राहावे असे मला वाटते
याप्रकरणी नवीन यांच्या आई नीरजा देवी यांनी आपल्या नातवाविरुद्ध सुनेच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. खुनी मुलाचे लष्करात असलेले वडील नवीन रडत रडत म्हणाले, "आपल्या मुलाने आनंदी जीवन जगावे असे प्रत्येक माणसाला वाटते, पण माझ्या मुलाने आयुष्यभर तुरुंगात राहावे असे मला वाटत आहे. मुलाला त्याच्या गुन्ह्याची पूर्ण शिक्षा मिळावी. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार."
चिमुकली बहीण हत्येची साक्षीदार
वडील नवीन यांनी सांगितले की, 10 वर्षांच्या मुलीने सर्व काही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. ती प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर राहणार आहे. मुलीला कोणीही फसवू शकत नाही आणि ती या मानसिक आघातातून बाहेर येईल, म्हणून ती तिला स्वत:जवळ ठेवणार आहे.
कुटुंब लखनऊला होते, वडिलांची पोस्टिंग प. बंगालमध्ये
वाराणसीचे रहिवासी असलेले नवीन कुमार सिंह हे लष्करात कनिष्ठ आयोग अधिकारी आहेत. त्यांची पोस्टिंग पश्चिम बंगालमध्ये आहे. लखनऊच्या पीजीआय भागातील यमुनापुरम कॉलनीत त्यांचे घर आहे. येथे त्यांची पत्नी साधना (40 वर्षे) त्यांच्या 16 वर्षीय मुलगा आणि 10 वर्षांच्या मुलीसोबत राहत होत्या.
मुलाने मंगळवारी रात्री वडील नवीन यांना व्हिडिओ कॉल करून आईची हत्या केल्याचे सांगितले. तसेच मृतदेह वडिलांना दाखवला. या प्रकरणात जी प्राथमिक बाब समोर आली आहे, त्यात PUBG खेळू न दिल्याने संतापलेल्या मुलाने आईला गोळ्या घालून ठार मारल्याचे समोर आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.