आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • UP Minister Mohasin Rajha Criticized On Priyanka Gandhi After She Cleaning Her Car Glass

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रियंका गांधींच्या ताफ्यात अपघात:दुर्घटनेनंतर प्रियंका गांधींनी स्वत: आपल्या गाडीचा काच स्वच्छ केला, योगी आदित्यनाथांचे मंत्री म्हणाले - काचेऐवजी स्वतःचे तोंड स्वच्छ करावे

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रियंकांच्या गाडीचा काच स्वच्छ नव्हता आणि चालकाला समोरचे दिसण्यात अडचण आली होती

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी गुरुवारी उत्तर प्रदेशतील रामपूरकडे जात होत्या. यादरम्यान जाताना त्या स्वत: गाडीच्या काचा स्वच्छ करताना दिसल्या. विंडस्क्रीन साफ ​​करताना प्रियंकाचे फोटो व्हायरल झाले असताना उत्तर प्रदेश सरकारचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री मोहसीन रझा यांनी त्यांच्यावर टीका केली. काँग्रेसच्या नेत्यांनी काचांऐवजी स्वतःचे तोंड स्वच्छ केले पाहिजे, असे ते म्हणाले.

प्रियंका रामपूरच्या दिशेने जात असताना तिच्या ताफ्यातील वाहनांची धडक झाली. प्रियंकांच्या गाडीचा काच स्वच्छ नव्हता आणि चालकाला समोरचे दिसण्यात अडचण आली होती. अशा परिस्थितीत चालकाने अचानक हापूरजवळ ब्रेक लावले, त्यानंतर त्यांच्या मागून येणारी वाहने थांबवावी लागली, त्यामुळे ती एकमेकांवर धडकली. दरम्यान या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. अपघातानंतर प्रियंका यांनी कारमधून उतरत स्वतः काच स्वच्छ केला.