आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • UP Muslim Fakir Forced To Speak Jai Shri Ram Case Updates । Youth Arrested After Video Went Viral By UP Police

यूपीमध्ये मुस्लिमांना द्यायला लावल्या जय श्रीरामच्या घोषणा:तरुणांनी 3 फकिरांना काढायला लावल्या उठाबशा, लोकांनी गावाबाहेरही हाकलले

गोंडा, उत्तर प्रदेश22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील गोंडा येथे तीन मुस्लिम फकिरांसोबत अभद्रता करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. येथे एका तरुणाने जबरदस्तीने त्यांना जय श्रीराम म्हणण्यास भाग पाडले. कानपूर हिंसाचाराचा संदर्भ देत त्यांना दहशतवादीही संबोधण्यात आले. एवढेच नव्हे, तर त्यांना उठाबशाही काढायला लावल्या.

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फकीर नसून फकिरांच्या वेशात गावात फिरणारा मुस्लिम तरुण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, वाद वाढल्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली.

आधार कार्ड विचारले

हे प्रकरण गोंडाच्या खर्गुपूर डिंगूर गावातील आहे, जिथे दोन तरुण आणि एक वृद्ध भिक्षेसाठी फिरत होते. गावातील तरुणाने त्यांना हटकले. आधी त्यांचे नाव आणि पत्ता विचारले. नाव आणि पत्ता बरोबर न सांगितल्याने त्याने आधार कार्ड मागितले, पण फकीर कार्ड दाखवायला तयार नव्हते, तेव्हा तरुणाला राग आला. काठी घेऊन त्याने फकिरांना कान धरून उठाबशा काढायला लावल्या.

काठीच्या जोरावर तरुणाने मुस्लिम फकिरांना उठाबशा काढायला लावल्या.
काठीच्या जोरावर तरुणाने मुस्लिम फकिरांना उठाबशा काढायला लावल्या.

तरुणाने त्यांना जय श्रीरामचा नाराही द्यायला लावला. तसेच पुन्हा गावात फिरकू नका, अशी धमकी दिली. गावातील इतर लोकही तरुणांना साथ देताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ गावातील कोणीतरी बनवून सोशल मीडियावर टाकला.

तिन्ही फकिरांना मारहाणीसह त्यांना दहशतवादीही संबोधण्यात आले.
तिन्ही फकिरांना मारहाणीसह त्यांना दहशतवादीही संबोधण्यात आले.

लोकांनी गावातून हाकलून लावले

गावात पोहोचलेल्या मुस्लिम फकिराला एका तरुणाने हीन वागणूक तर दिलीच, पण व्हिडिओमध्ये अनेक लोक त्यांना शिवीगाळ करतानाही दिसत आहेत. अनेक लोकांचे आवाज स्पष्ट ऐकू येतात. एवढेच नाही तर या फकिरांना गावातून हाकलून लावण्यात आले आहे.

व्हिडिओवरून ओळख पटल्यानंतर पोलिसांनी गावातील या तरुणाला अटक केली आहे.
व्हिडिओवरून ओळख पटल्यानंतर पोलिसांनी गावातील या तरुणाला अटक केली आहे.

अशी प्रकरणे यूपीमध्ये यापूर्वीही आली आहेत

10 ऑगस्ट 2021 : कानपूरच्या बर्रा भागात एका मुस्लिम ई-रिक्षा चालकाला जबरदस्तीने जय श्रीराम असा जयघोष करायला लावला. पीडित तरुणाला चार दुचाकीस्वारांनी अडवून टोपीवरून विरोध केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात बजरंग दलाचेही नाव पुढे आले आहे. त्याचवेळी पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने धर्मांतराचा आरोप केला होता. या घटनेनंतर जवळपास महिनाभर परिसरात तणावाचे वातावरण होते.

12 जुलै 2021: उन्नावमध्ये, मदरशातील मुलांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्याचे प्रकरण समोर आले. येथे दुपारी नमाज अदा केल्यानंतर मदरशातील मुले क्रिकेट खेळण्यासाठी गेली. यावेळी चौघांनी त्याला मारहाण करत जय श्रीराम म्हणण्यासाठी दबाव टाकला. मुलांचे कपडे फाडून त्यांच्या सायकलची तोडफोड करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...