आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PSI चा महिलेसोबत डान्स:UP चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांनी दिला वेळ वाया न घालवण्याचा सल्ला

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील एका पोलिस उप निरिक्षकाचा (PSI) एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत हा PSI एका महिलेसोबत डान्स करताना दिसून येत आहे. नेटकऱ्यांनी या पोलिसावर टीकेची झोड उठवत त्याला आपला वेळ असा वाया न घालवण्याचा सल्ला दिला आहे.

DM चा व्हिडिओ झाला होता व्हायरल

हा व्हिडिओ ट्विट करत एक युजर म्हणाला - "दारोगाजी, पोलिसांच्या नोकरी कुठे आपला वेळ वाया घालवता. मुंबईत काहीतरी जुगाड करा." हे ट्विट पाहून अन्य एका युजरने आपल्याला कानपूरच्या डीमच्या डान्सचा व्हिडिओ आठवल्याचे उपरोधिकपणे सांगितले.

कानपूरमध्ये तेव्हा आई-मुलीचा जळून मृत्यू झाला होता. त्यानंतर कानपूर देहात महोत्सवात डीएम नेहा जैन यांचा स्टेजवर डान्स करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. पण त्यांचा हा व्हिडिओ जळीत कांडाच्या एक दिवस अगोदरचा होता. पण त्यानंतरही त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

नृत्य करताना DM नेहा जैन. शेजारील फोटोत जळीत कांडातील आई व मुलगी.
नृत्य करताना DM नेहा जैन. शेजारील फोटोत जळीत कांडातील आई व मुलगी.

या घटनेचे स्मरण करताना एक व्यक्ती म्हणाला, "पोलिस नाचला तर गुन्हा आणि DM नाचल्या तर कौतुक." त्याला उत्तर मिळाले, "गुन्हा कोण म्हणाले सांगा." उल्लेखनीय बाब म्हणजे सोशल मीडियावर यापूर्वीही एका पोलिस उप निरिक्षकाचा व कॉन्स्टेबलचा एक रंगतदार व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात हे दोघे नागीन डान्स करत होते.

दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांच्या या वाढत्या व्हायरल व्हिडिओवर उत्तर प्रदेश सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. सरकारने यासंबंधी एक सोशल मीडिया गाइडलाइन जारी केली आहे. पोलिस कर्मचाऱ्यांना या गाइडलाइनचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेत.

बातम्या आणखी आहेत...