आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायूपीच्या मेरठमध्ये एका मुलाने आपल्या मैत्रिणीला खूश करण्यासाठी स्वतःच्याच घरी चोरी केली. त्याने स्वतःच्या मित्रांच्या मदतीने आई-वडिलांना बंधक बनवून रोख रकमेसह दागिणे चोरले. त्याने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी मोबाइलचे कॉल, मेसेज व चॅट हिस्ट्री डिलीट केली होती. पण पोलिसांनी गूगल बॅकअपच्या मदतीने सर्व हिस्ट्री काढून त्याच्या मुसक्या आळल्या.
शनिवारी रात्री शहराच्या परतापूर ठाणे हद्दीतील शताब्दी नगर सेक्टर 4Cमध्ये सिंघाडा आडती योगेश कुमार यांच्या घरी चोरी झाली होती. त्यात 14 लाख रुपयांच्या रोख रकमेसह सोण्याचांदीचे दागिणे चोरण्यात आले होते. पोलिसांनी आडत्याचा मुलगा व मित्रांकडून लुटीची रकम व दागिणे जप्त केले. त्यांनी अवघ्या 24 तासांतच या प्रकरणाचा गुंता सोडवला. आता वाचा या लुटमारीची इनसाइड स्टोरी...
घरात रोख रकम असल्याचे मुलाला ठावूक होते
आडती योगेश यांना 3 अपत्य आहेत. मोठा मुलगा नमन आहे. त्यानंतर एक मुलगी व छोटा मुलगा आहे. नमनने आपले 3 मित्र चिंटू सैनी, शिवम सैनी, शिवम गिल यांच्यासोबत स्वतःच्याच घरात चोरी केली. घरात सिंघाड्याचे पेमेंट आल्याचे माहिती होते. हे पैसे घरात कुठे ठेवले हे ही त्याला माहिती होते. त्याला तिजोरीची चावी कशी मिळवायची हे ही माहिती होते. त्यामुळे त्याने याच विश्वासाचा फायदा घेऊन ही चोरी केली.
पोलिसांना सांगितले -घरातील पैसे चोरून ऐश करण्याची योजना होती
पोलिसांच्या माहितीनुसार, नमन यांच्या वडिलांनी आपला मुलगा बिघडल्याचे सांगितले होते. तसेच त्याला महागडे छंद असल्याचेही सांगितले होते. त्याला आपले छंद पूर्ण करण्यासाठी पैसे हवे होते. त्यामुळे त्याने ही चोरी केली. नमननेही आपला गुन्हा कबूल केला आहे. घरातील पैसे चोरून ऐश करण्याची आपली योजना होती.
नमने मित्रांना सांगितली प्लॅनिंग
नमनने पोलिसांना सांगितले की, त्याने आपल्या मित्रांना पूर्ण प्लॅनिंग सांगितली होती. कॅश व दागिणे चोरी करून ते आपसात वाटून घेण्याची व त्यातून मिळालेला पैसा खर्च करण्याची त्यांची योजना होती. नमनच्या मित्रांनी पैशाच्या लालसेपोटी त्याला मदत करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार, नमनने मोबाइल कॉल, मेसेंजर व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून या तिन्ही मुलांशी संपर्क साधला. तो त्यांना घरातील पैसे कुठे ठेवले याची सातत्याने माहिती देत होता.
मध्यरात्री अडीचच्या सुमारास नमनने दरवाजा उघडला
मध्यरात्री अडीचच्या सुमारास सर्वजण झोपल्यानंतर नमनने आपल्या मित्रांना घरात घेतले. त्यांच्यासाठी त्याने दरवाजाही उघडला. तिजोरीचे लोकेशन सांगितले. त्यानंतर या मित्रांनी नमनच्या कुटुंबीयांना बांधले व तिजोरी उघडून रोकड व दागिणे घेऊन पोबारा केला. सर्वांचे चेहरे झाकलेले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटली नाही. ते गेल्यानंतर आडत्याने रात्रीच पोलिसांकडे घरातून 14 लाख रुपये व दागिणे चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली.
गूगल बॅकअपद्वारे पोलिसांनी चॅट हिस्ट्री काढली
एवढी मोठी चोरी झाल्यामुळे पोलिसांवरही दबाव होता. त्यांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी आडत्याच्या कुटुंबातील सदस्यांचे मोबाइल चेक केले असता नमनच्या मोबाइलमधून सर्व गूपित उजेडात आले. नमनने सर्व कॉल्स, मेसेज व चॅट्स डिलीट केले होते. पण गूगल बॅकअपद्वारे पोलिसांना सर्व हिस्ट्री मिळाली व सत्य उजेडात आले.
SP सिटी पीयूष सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी नमनसह त्याच्या तिन्ही मुलांना अटक केली. चौकशीत या मुलांनी संपूर्ण वस्तुस्थिती सांगितली. पोलिसांनी त्यांना अटक करून तुरुंगात पाठवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.