आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाराणसीमध्ये कोरोनाची बनावट लस आणि टेस्टिंग किट बनवून देशाच्या इतर राज्यांना पुरवल्या जात होत्या. बुधवारी, UP-STFच्या वाराणसी युनिटने लंका पोलिस स्टेशन अंतर्गत रोहित नगरमधील एका घरावर छापा टाकून या फसवणुकीचा पर्दाफाश केला. एसटीएफने घटनास्थळावरून 5 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून कोविशील्ड आणि Zycov-d च्या बनावट लसी, बनावट टेस्टिंग किट, पॅकिंग मशीन, रिकाम्या वॉयल आणि स्वॅब स्टिक जप्त करण्यात आल्या आहेत.
सिद्धगिरी बागेतील धनश्री कॉम्प्लेक्स येथील राकेश थवानी, बौलिया लहरतारा येथील अरुणेश विश्वकर्मा, पठाणी टोला चौकातील संदीप शर्मा, बलिया जिल्ह्यातील नागपुर रस्डा येथील समशेर आणि नवी दिल्लीतील मालवीय नगर येथील लक्ष्य जावा अशी आरोपींची नावे आहेत. एसटीएफकडून आरोपींची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमार्गे दक्षिण भारतातील अनेक राज्यांना लसीचा पुरवठा केला जात होता.
लक्ष्य करत होता सप्लाय, आम्ही बनवत होतो
एसटीएफच्या चौकशीत राकेश थवानीने सांगितले की, तो संदीप शर्मा, अरुणेश विश्वकर्मा आणि समशेर यांच्यासोबत बनावट लसी आणि टेस्टिंग किट बनवत होता. तो लक्ष्य जावाला बनावट लसी आणि किट पुरवायचा. लक्ष्य त्याच्या नेटवर्कद्वारे वेगवेगळ्या राज्यांमध्ये बनावट लसी आणि किट पुरवत असे.
सुमारे चार कोटी रुपयांचे औषध पकडले आहे
यूपी-एसटीएफच्या वाराणसी युनिटचे अतिरिक्त एसपी विनोद कुमार सिंह म्हणाले की, आम्हाला माहिती मिळाली होती की रोहित नगरमध्ये कोविडच्या बनावट लसी आणि बनावट चाचणी किट इत्यादी बनवल्या जात आहेत. या माहितीच्या आधारे छापा टाकून ५ जणांना अटक करण्यात आली. यासोबतच बनावट लसी आणि बनावट टेस्टिंग किट तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. सध्या पाचही आरोपींची चौकशी सुरू आहे. आरोपींची चौकशी करून टोळीची माहिती गोळा केली जात आहे. जप्त केलेल्या औषधांची बाजारभावानुसार अंदाजे किंमत सुमारे चार कोटी रुपये आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.