आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भाेपाळहून चेन्नई- मुंबईचा रेल्वे प्रवासाचा वेळ १ ते २ तासांनी वाचणार आहे. या विभागांतील ‘ग्रुप-ए’ रेल्वे मार्गांवर गाड्या १३० किलाेमीटर प्रतितास वेगाने धावण्याची चाचणी आता अंतिम टप्प्यात आहे. पुढील महिन्यात दाेन्ही शहरांच्या प्रवासासाठी लागणारा आणि वाचणारा सरासरी वेळ लक्षात घेऊन त्या पद्धतीने अधिकृत घाेषणा करून वेळापत्रकात बदल केला जाईल.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे सतत प्रवासाचा वेळ किती कमी करता येईल, यासाठी विविध प्रयाेग करत आहे. त्याच्या विविध स्तरावर चाचण्यादेखील केल्या जात आहेत. काही महिन्यांतच त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. वरिष्ठ प्रबंधक विजय प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार बीना- इटारसी विभागात १३० किलाेमीटर प्रतितास वेगाने गाड्या नेण्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.
इंदूर-पटणा, जबलपूर-बांद्रा स्पेशल रेल्वे सुरु राहणार
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती संख्या, उत्पन्न आणि गरज लक्षात घेऊन आठवड्यातून दाेनदा धावणाऱ्या इंदूर-पटणा, जबलपूर- वांद्रा आणि यशवंतपूर-जयपूर या तीन गाड्या दरराेज साेडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काेराेना प्रतिबंधाच्या नियमांनुसार या सर्व गाड्या विशेष श्रेणीतच धावतील. त्यांच्यासाठी आगाऊ आरक्षण अनिवार्य असेल. काेणत्याही प्रवाशाला आरक्षित तिकिट नसेल तर स्थानकावर प्रवेशदेखील दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम आधीप्रमाणेच कायम ठेवण्यात आलेले आहेत.
वेळेपूर्वीच उद्दिष्ट्य साध्य
रेल्वे मंत्रालयाद्वारे पश्चिम-मध्ये रेल्वे विभागाला १३० किलाेमीटर प्रतितास वेगाने गाड्या ‘ग्रुप-ए’मार्गावर चालविण्यासाठी अन्य विभागांच्या तुलनेत अव्वल घाेषित करण्यात आले आहे. बीना-इटारसी विभागाने वेळेपूर्वीच हे लक्ष्य साध्य केले आहे. बरखेडा ते बुधनी या मार्गावर काम पूर्ण हाेताच उर्वरित २६ स्थानकेदेखील याच वेगाने गाड्या जाण्यासाठी सक्षम हाेतील.
सध्याचा वेग आहेत ९० ते ११० किलोमीटर प्रतितास
पश्चिम आणि मध्य रेल्वे ‘ग्रुप-ए’ मार्गांवर म्हणजेच महानगरांना जाेडणाऱ्या मार्गांवर राजधानीसारख्या सुपरफास्ट गाड्या चालविते. त्यांचा सध्याचा सरासरी वेग ९० ते ११० किलाेमीटर आहे. त्यात २० किलाेमीटरने वाढ झाल्यास ताे १३० किलाेमीटरपर्यंत वाढेल. त्यातून सुमारे १ तास वाचेल. त्याबराेबरच थांब्यांची संख्या कमी केली जाईल. थांब्यांवरील वेळ देखील कमी केला जाईल. या गाड्यांना इतर गाड्यांच्या तुलनेत जास्तीत जास्त माेकळा मार्ग मिळेल, असे नियाेजन केले जाणार असल्याने प्रवासाचा वेळ १ ते २ तासांनी कमी हाेईल, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
अशा रितीने झाले काम
बीना-भाेपाळ विभागात अप-डाऊन रेल्वे मार्ग आणि भाेपाळ-इटारसी विभागातील २३३ किलाेमीटर रुळांचे आधुनिकीकरण करण्यात याले. हे कार्य अवघड हाेते. कारण त्यात ४०० माेठी वळणे हाेती. तेथेही रुळ बदलण्यात आले. त्यामुळेच १३० किलाेमीटरचा कमाल वेग गाठणे शक्य झाले. त्यातून लांब पल्ल्यांच्या मार्गांवरील प्रवासाचा वेळ ५२ ते ६० मिनिटांनी कमी झाला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.