आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Up To 50% Production Start In Industrial Areas In Rajasthan, Punjab, Haryana, Himachal Pradesh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुळावर अर्थव्यवस्था:राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचलातील औद्योगिक क्षेत्रात 50% पर्यंत उत्पादन सुरू

जयपूर, चंदिगड, रांची, रायपूर, औरंगाबाद, भाेपाळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाहतुकीत अडथळा आणि कामगारांच्या कमतरतेमुळे खर्च 3 टक्के वाढला

केंद्र सरकारने टाळेबंदी-४ मध्ये टाळेबंदीच्या नियमांत शिथिलतेसह औद्यागिक उत्पादन सुरू करण्यास परवानगी दिली आहे. असे असले तरी कुठे किती कडक नियम लागू असतील ते त्या-त्या राज्यांवर अवलंबून असेल. राजस्थानमध्ये राज्यातील जवळपास तीन लाख लहान-मोठ्या उद्योग युनिटपैकी जवळपास ४०% मध्ये उत्पादन सुरू झाले आहे. सीतापूर सेझमध्येही बहुतांश ज्वेलरीच्या युनिटमध्ये प्रलंबित ऑर्डर पूर्ण करण्यासाठी दागिने तयार केले जात आहेत. मात्र, औद्योगिक युनिट्समध्ये सध्या ३०-४०% च कामगार आहेत. भोपाळच्या गाेविंदपुरा औद्योगिक क्षेत्रातील ११०० लहान-मध्यम उद्योगांना जिल्हा प्रशासनाने व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

हरियाणा : वाहन निर्मिती सुरू झाली

हरियाणाच्या मानेसर क्षेत्रातील मारुतीपासून हीरो ग्रुपने उत्पादन सुरू केले आहे. मुरथलनजीक तांदळाच्या युनिट्सनेही काम सुरू केले आहे. त्यांच्या विदेशी ग्राहकावर काहीसा परिणाम झाला आहे आणि त्यांना पुन्हा ऑर्डर मिळत आहे. पानिपतचच्या हँडलूम युनिट्समध्येही काम सुरू झाले आहे. मात्र, त्यांच्याकडे ऑर्डर जास्त येत नाहीत. पंजाबमध्ये विविध उद्योगात काम सुरू होत आहे.

छत्तीसगड : ८०% उत्पादन सुरू

छत्तीसगडचा कणा समजल्या जाणारा पोलाद उद्योग, लघु व कुटीर उद्योगासह अन्य औद्योगिक युनिट्समध्ये काम सुरू झाले आहे. उरला इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अश्विन गर्गनुसार, छत्तीसगडमध्ये सुमारे ६०० स्पंंज आयर्न, फर्नेंस आणि रोलिंग मिल आहेत. यामध्ये जवळपास ८०% उद्योगांत मॅन्युफॅक्चरिंग सुरू झाले आहे. उर्वरित २०% उद्योग युनिटमध्ये हळूहळू एक दोन दिवसांत काम सुरू होईल.

झारखंड : ३३% कामावर बोलावले

झारखंडमध्ये सुमारे ४४ हजार एमएसएमई आहे. यामध्ये ११ लाख मजूर काम करत होते. सध्या यापैकी सुमारे ३०% तून काम घेतले जात आहे. या उद्योगांना बाजारपेठ खुली होण्याची प्रतीक्षा आहे. बाजारपेठ खुली झाल्यावर त्यांच्याद्वारे तयार केलेल्या सामग्रीची मागणी वाढेल. मजूरही ५० टक्के कमी आहेत. जमशेदपूर येथील टाटा स्टीलमध्ये ९० हजार कामगार आहेत. यापैकी २७,००० जणांना कामावर बोलावले आहे. टाटा मोटर्सच्या प्लँटमध्ये जवळपास २७,००० कर्मचारी आहेत.

पंजाब- हिमाचल : कामकाज सुरू

लुधियानात होजियरी, सायकल उद्योगात ५०% पेक्षा जास्त युनिट्सने काम सुरू केले आहे. मात्र, कच्च्या मालाचा पुरवठा आणि कामगारांची कमतरता ही एक समस्या आहे. हिमाचलात बद्दी-नालागडच्या औषध कंपन्यांत कच्च्या मालात ५०-१००% पर्यंत वाढलेल्या भावामुळे अडचणी आल्या आहेत. चीनहून आयात होणारी एपीआय म्हणजे औषध तयार करण्याच्या मूळ कंटेंटच्या पुरवठ्यात घट आली आहे. यामुळे भाव वाढत आहेत.

महाराष्ट्र : २३% कर्मचारी कामावर पोहोचले

महाराष्ट्रात लहान-मोठे ६.८३ लाख उद्योग प्रकल्प् आहेत. यापैकी ३८,३६३ उद्योगांनी ८,२३,६६८ कामगारांसोबत काम सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे परवानगी मागितली होती. यापैकी २३% म्हणजे, १,९१,३३६ कामगारांनी आपली नावे नोंदवली आहेत. अशा स्थितीत ६,३२,३३२ कामगार कामावर पोहोचले नाहीत. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यानुसार, बहुतांश कामगार आपल्या घरी गेले आहेत. त्यात कुशल आणि अर्धकुशल दोन्ही प्रकारच्या कामगारांचा समावेश आहे. आता उद्योगांची जबाबदारी आहे की, त्यांनी अकुशलना कुशल करून उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू करावेत,असे सांगण्यात येते.  

बातम्या आणखी आहेत...