आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जुनी वाहने नष्ट करण्यासाठी व्हेइकल स्क्रॅपेज धोरण जाहीर तर केले, मात्र अद्याप स्पष्ट नाही की, हे धोरण कसे लागू होईल आणि सर्वसामान्यांना याचा कसा फायदा होईल. अर्थसंकल्पानंतर परिवहनमंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, १५ दिवसांत यासाठीचे नियम जाहीर केले जातील. मंत्रालय पातळीवर तयार धोरणाची माहिती घेतली असता समजले की, जुने वाहन स्क्रॅप केल्यावर नव्या वाहनाचे नोंदणी शुल्क माफ करण्याचा सरकारचा विचार आहे. एवढेच नव्हे तर स्क्रॅप करताना जुन्या वाहनाच्या किमतीचे मूल्यांकन करून तेवढीच सूट नव्या वाहनाच्या किमतीवर दिली जाऊ शकते. हे दोन्ही फायदे घेण्यासाठी तुम्हाला जुन्या वाहनाचे स्क्रॅपेज प्रमाणपत्र द्यावे लागेल.
नवे वाहन घेणे अधिक फायदेशीर करण्यासाठी स्क्रॅपेज प्रमाणपत्राशिवायही सरकार नोंदणी शुल्क ५०% कमी करू शकते. तसेच स्क्रॅपेज प्रमाणपत्र दिल्यास रस्ता करातही सूट दिली जाऊ शकते. नव्या वाहनांवरील सवलत वाढवण्याबरोबरच जुने वाहन ठेवणे सरकार महाग करणार आहे.
अमेरिकेत स्क्रॅपिंगमुळे नव्या कारवर ३ लाखांपेक्षा जास्त सूट
जुने वाहन स्क्रॅप करताना त्याच्या किमतीचे मूल्यांकन केले जाईल. ही किंमत गाडीची स्थिती आणि वापरावर अवलंबून असेल. दीर्घकाळापासून उभ्या गाड्यांचेही जर इंजिन आणि पार्ट््स चांगले असतील त्यांचीही किंमत लावली जाईल. हे धोरण अमेरिका आणि जर्मनीसारख्या देशात यशस्वी स्क्रॅप धोरण बघून आणले गेले आहे. या देशांमधील उदाहरण बघता नव्या गाडीवर सरासरी २ लाखांपेक्षा जास्त सूट मिळू शकते.
एका स्क्रॅपेज प्रमाणपत्रावर एकदाच मिळेल सवलत
परिवहन मंत्रालयानुसार सध्या नव्या कारचे नोंदणी शुल्क ५ ते १० हजार रुपये तर मोठी गाडी आणि आयातीत कारचे नोंदणी शुल्क २० हजार रुपये आहे. नव्या धोरणानुसार जर त्याच श्रेणीतील जुने वाहन स्क्रॅप केल्याचे प्रमाणपत्र दाखवल्यास नव्या गाडीचे नोंदणी शुल्क द्यावे लागणार नाही. अट अशी की स्क्रॅप प्रमाणपत्रावर आधी लाभ घेतलेला नसावा. यात श्रेणीचा अर्थ प्राइस रेंज नाही तर इंजिन व वापराच्या आधारे केलेल्या वर्गीकरणातून होईल. उदाहरणासाठी मारुती ऑल्टो व ऑडी दोन्ही लाइट मोटार व्हेइकल श्रेणीत येतात.
फिटनेस- स्क्रॅपिंगसाठी असतील संेटर, ४३ हजार कोटींचा उद्योग
देशात ऑटोमेटेड फिटनेस सेंटर स्थापन केले जातील. तेथून फिटनेस प्रमाणपत्र मिळेल. वाहने सुरक्षित पद्धतीने नष्ट करण्यासाठी राज्यांत स्क्रॅपिंग सेंटर स्थापन केले जातील. यासाठी वेगळे धोरण तयार करण्यात आले आहे. यातून वाहन स्क्रॅपिंगचा ४३ हजार कोटींचा नवा उद्योग उभारला जाण्याची आशा आहे.
- सूत्रांनुसार कारसारख्या हलक्या मोटार वाहन नोंदणीचे नूतनीकरण १५ हजार रु. आणि वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या कारचे नूतनीकरण २० हजार रुपयांपर्यंत होऊ शकते. विशेष म्हणजे १५ वर्षे जुन्या कारची किंमत २० ते ४० हजार रुपयांच्या आत असते.
जुने वाहन स्क्रॅप केल्यास कोठे किती सूट
देश जास्तीत जास्त सूट (रुपयांत)
अमेरिका 3,27,562
जर्मनी 2,20,000
ब्रिटन 2,00,000
फ्रान्स 2,63,108
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.